राज्याच्या शिक्षण मंडळाद्वारे शुक्रवारी दुपारी एक वाजता दहावीच्या निकालाची संकेतस्थळावर जाहीर झाला. परंतु निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही क्षणातच वेबसाईट क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांना दिवसभर निकालच पाहता आलेला नाही. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशीच अवस्था होती. सरकारच्या लेखी शैक्षणिक धोरणांबाबत कमालीची उदासिनता असताना, आता क्रॅश झालेली साईट ही विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी खूपच डोकेदुखी ठरली. मंडळाच्या वेबसाईटवर आलेल्या तांत्रिक बिघाडाची चौकशी करण्यासाठी आता पाच जणांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना आता करण्यात आलेली आहे. आता चौकशीचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा आहे.
निकाल बघण्यासाठी http://result.mh-ssc.ac.in आणि www.mahahsscboard.in संकेतस्थळ देण्यात आले. मात्र, निकालाची घोषणा झाल्यावर लगेच संकेतस्थळ ‘क्रॅश’ झाले. त्यामुळे जवळपास कोणत्याही विद्यार्थ्यांना निकाल बघता आला नाही. याप्रकाराने विद्यार्थी आणि पालकांची धावपळ झाली. (The-website-of-the-10th-result-crashed-nad86)
निकाल जाहीर करण्याआधी ट्रायल रन घेतला होता का? निकाल घोषित करण्यासाठी तसेच लोड उठविण्यासाठी पर्यायी व्यवस्था होती का, या प्रश्नांवर आता चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे.
हे ही वाचा:
जय हो! लडाखमध्ये चार नवे विमानतळ आणि ३७ हेलिपॅड
भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मला मोठी लोकप्रियता
भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्याला सुरूवात
पावसाच्या हाहाकाराने मुंबईत अपघातांची मालिका
यंदा परीक्षा रद्द झाल्याने नववी आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यात आला. त्यामुळे निकालात कोणत्या विषयात किती गुण मिळाले याची उत्सुकता शिगेला होती. त्यामुळे दहावीच्या निकालाची घोषणा झाल्यावर जवळपास सर्वच विद्यार्थी आणि पालकांनी घरच्या लॅपटॉप आणि मोबाईलवर निकालाचे संकेतस्थळ सुरू करीत निकाल शोधण्यास सुरुवात केली होती. परंतु पालक तसेच विद्यार्थी या दोहोंच्या पदरी ठाकरे सरकारच्या शिक्षण अनास्था धोरणामुळे निराशाच पदरी पडली.