भारत-इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना आज अहमदाबामध्ये सुरु झाला. आजच्या दिवसाअखेर इंग्लडचा संघ, २०५ धावांत गारद झाला. भारताने फलंदाजीला येऊन २४ धावा करत एक गडी गमावला आहे.
भारत विरुद्ध इंग्लड कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु झाला. या सामन्यातही इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सत्राच्या शेवटी इंग्लंडचा संघ ७४ धावांमध्ये ३ गाडी गमावून बसला होता. मात्र दुसऱ्या सत्रात बेन स्टोक्स आणि बेअरस्टो यांनी डाव सावरला. दुसऱ्या सत्राच्या अखेरीस इंग्लंडचा स्कोर १४४/५ असा होता. मात्र शेवटच्या सत्रामध्ये भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचे ५ खेळाडू तंबूत माघारी पाठवले आणि इंग्लंडचा संघ २०५ धावांमध्ये गुंडाळला.
हे ही वाचा:
भारतीय फलंदाजी सुरवातही अडखळती झाली होती. भारताने पहिला खेळाडू शून्य धावांवरच गमावला. अँडरसनने शुभमन गिलला बाद केले. दिवस अखेर भारताचा स्कोर २४/१ असा आहे. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा हे भारतीय फलंदाज नाबाद खेळत आहेत. या कसोटीमध्ये भारताने विजय मिळवला किंवा हा सामना अनिर्णित राखण्यात भारताला यश आले तर, भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरणार आहे.