इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांत खेळल्या जाणाऱ्या ऍशेसच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने केवळ ३९३ धावांवर डाव घोषित केला. त्यांचा सर्वोत्तम फलंदाज ज्यो रूट ११८ धावांवर खेळत असताना हा डाव घोषित करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या या सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंड ऑस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमक क्रिकेट खेळत असल्याचे दिसून आले. पहिल्या ऍशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने प्रति षटक ५.०३ धावा केल्या. झॅक क्रॉलीने दिवसाच्या खेळाच्या पहिल्याच सत्रात जोरदार कव्हर ड्राइव्ह खेचत तो पुढे कसा खेळणार आहे, याची चुणूक दाखवली. जो रूटने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलंडला षटकार ठोकले. हॅरी ब्रूक विचित्र पद्धतीने बाद झाला. जॉनी बेअरस्टो आणि मोईन अली यांनी त्यांची विकेट नॅथन लियॉनकडे सहजपणे फेकून दिली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, इंग्लंडने अवघी ७८ षटके फलंदाजी केल्यानंतर डाव घोषित केला. त्यांचा सर्वोत्तम फलंदाज जो रूट तेव्हा ११८ धावांवर नाबाद होता.
इंग्लंडने त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘बॅझबॉल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आक्रमक ब्रँडनुसार खेळ केला. तर, नुकताच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा मानकरी ठरलेल ऑस्ट्रेलियाचा संघही इंग्लंडविरुद्ध दोन हात करण्यासाठी सज्ज होता. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्कने ३९३ धावांवरच पहिला डाव घोषित केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि झॅक क्रॉली लगेच बाद झाला. कर्णधार स्टोक्सला धक्का बसला. बेन डकेटला जोश हेझलवूडने झटपट बाद केले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ऑली पोपने आणि क्रॉलीने ऑस्ट्रेलियाच्या नवीन चेंडूवर जोरदार हल्ला चढवला. सलामीवीराने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर क्रॉली बाद झाला. त्याने ७३ चेंडूंमध्ये ६१ धावा पूर्ण केल्या होत्या. तर, हॅरी ब्रूक ३२ धावांची खेळी करून नॅथन लियॉनच्या चेंडूवर बाद झाला.
जॉनी बेअरस्टोने आपली निवड योग्य असल्याचे सिद्ध केले, त्याने ७८ चेंडूंमध्ये ७८ धावा ठोकल्या. त्यांच्या १२१ धावांच्या भागिदारीमुळे इंग्लंडला अडचणीतून बाहेर काढले. बेअरस्टो बाद झाल्यानंतर, निवृत्तीनंतर कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या मोईन अलीने केवळ १७ चेंडूंत १८ धावा ठोकल्या. रूटने सनसनाटी खेळी करून चार षटकार आणि सात चौकार लगावले.
हे ही वाचा:
बिपरजॉयचं आगमन झालं आणि ७०० बाळांनी जन्म घेतला
सावरकर आमचे आदर्श, उद्धव ठाकरे गटाला आली जाग
“इस्लाम कबूल कर, नाहीतर गोळ्या घालेन”, अल्पवयीन मुलीला धमकी
ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक
गोलंदाजांना अनुकूल नसणाऱ्या खेळपट्टीवर फिरकीपटू नॅथन लियॉन याने चार गडी बाद केले. या गोलंदाजाने बेअरस्टो आणि मोईन यांना मोठे फटके खेळायला लावले आणि त्याच्या धाडसी गोलंदाजीचे बक्षीस त्यांना मिळाले.