इंग्लंडला श्रीलंकेनेही धुतले

वर्ल्डकपमधील पाच सामन्यातला चौथा पराभव

इंग्लंडला श्रीलंकेनेही धुतले

वनडे वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडच्या खराब कामगिरीचा सिलसिला सुरूच आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. विश्वविजेत्या इंग्लंडला पाच सामन्यांत चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. इंग्लंडला १५६ धावांवर रोखून श्रीलंकेने आठ विकेट्सनी हा सामना जिंकला.

 

चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात झालेल्या पराभवामुळे इंग्लंडचा संघ चक्क दहा संघात नवव्या स्थानावर घसरला आहे. आता उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांना अनेक कसरती कराव्या लागणार आहेत. आता पुढील सलग चारही लढती त्यांना जिंकाव्या लागतील तसेच त्यांची जी -१.६३४ ही धावगती आहे त्यात प्रचंड सुधारणा करावी लागेल.

हे ही वाचा:

राहुल शेवाळे प्रकरणातील उद्धव ठाकरे, संजय राऊतांचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

चेक प्रजासत्ताकमध्ये १० लाख डॉलरचा पाऊस!

क्रिकेटपटू दानिश कनेरियाने सांगितली, धर्मांतर, मैदानावर नमाज, पाकिस्तानमधील हिदूंची दुरवस्था

गुणरत्न सदावर्ते यांनी प्रक्षोभक बोलणं टाळावं !

इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकली हीच काय ती त्यांची कमाई. बाकी बाबतीत ते पिछाडीवरच राहिले. जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिन मालन यांनी पहिल्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूजने मालनला बाद केले आणि इंग्लंडची घसरण सुरू झाली. ३३.२ षटकांत १५६ धावांवर इंग्लंडचा डाव आटोपला.

 

श्रीलंकेच्या लाहिरु कुमाराने बेन स्टोक्स, जोस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोन असे महत्त्वाचे मोहरे टिपले तर कासुन राजिथाने जॉन बेअरस्टोचा अडथळा दूर केला.बेन स्टोक्स आताच मांडीच्या दुखापतीतून सावरला आहे तरीही त्याने ७३ चेंडूंत ४३ धावांची कामगिरी केली.

 

छोटी धावसंख्या असल्यामुळे श्रीलंकेचे फलंदाज झटपट माघारी धाडणे हाच एक मार्ग इंग्लंडपुढे होता. त्यांना कुसल परेरा व कुसल मेंडिस हे दोन्ही फलंदाज झटपट माघारी धाडता आले. पण पाथुम निसंका आणि सादिरा समरविक्रमा यांनी इंग्लंडचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही.

 

आधीच श्रीलंकेसारख्या संघाकडून पराभूत झालेला इंग्लंडचा संघ रविवारी भारताशी झुंजणार आहे. भारताने आतापर्यंत सर्व लढती जिंकून पदकतक्त्यात अव्वल स्थान मिळविले आहे. त्यामुळे भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

Exit mobile version