युरो कप: इंग्लंड, क्रोएशिया पुढल्या फेरीत दाखल

युरो कप: इंग्लंड, क्रोएशिया पुढल्या फेरीत दाखल

युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या मंगळवारी रात्री झालेल्या सामन्यात इंग्लंड आणि क्रोएशिया संघाने विजय नोंदवला आहे. क्रोएशियाने स्कॉटलँडचा ३-१ असा दारुण पराभव केला तर इंग्लंडने चेक रिपब्लिक या संघाला १-० ने मात दिली. या सामन्यानंतर स्पर्धेच्या ग्रुप डी मध्ये इंग्लंड संघ हा प्रथम क्रमांकावर असून क्रोएशिया दुसऱ्या स्थानावर आहे. तर चेक रिपब्लिक आणि स्कॉटलँड हे संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. त्यामुळे इंग्लंड आणि क्रोएशिया या दोन्ही संघांचे पुढल्या फेरीतील स्थान पक्के झाले आहे.

इंग्लंड विरुद्ध चेक या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांना कडवी झुंज देत होते. पण सामन्याचा एकमेव गोल करण्यात इंग्लंड संघाला यश आले. सामन्याच्या १२ व्या मिनिटाला केलेला हा गोल सामन्याचा निर्णायक गोल ठरला. इंग्लंडचा आघाडीचा खेळाडू रहीम स्टर्लिंग याने एक अप्रतिम हेडर मारत गोल नोंदवला. त्यासाठी इंग्लंड संघाने उत्तम अशा सांघिक खेळाचे दर्शन घडविले.

हे ही वाचा:

मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सी यांची ९३७१ कोटींची संपत्ती ईडी बँकांना देणार

नवी मुंबई विमानतळाला आता वसंतराव नाईकांचे नाव देण्याचीही मागणी

निवडणुका रद्द करा अन्यथा भाजपाचं उग्र आंदोलन

ठाकरे सरकारमध्ये ओबीसीविरोधात कट रचण्याचं षडयंत्र सुरु

तर क्रोएशिया विरुद्ध स्कॉटलँड हा सामना एकतर्फी झाला. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघानी एक एक गोल करत बरोबरी साधली होती. १७ व्या मिनिटाला गोल नोंदवत क्रोएशियाने आघाडी घेतली होती. पण ४२ व्या मिनिटाला गोल करत स्कॉटलँडने बरोबरी साधली. पण पुढे सामन्याच्या उत्तरार्धात क्रोएशियाने आपला खेळ अधिक अक्रमकी करता सामन्यावर संपूर्णपणे पकड मिळवली. दुसऱ्या हाफमध्ये दोन गोल करत क्रोएशियाने ३-१ विजय मिळवला.

Exit mobile version