डेन्मार्कला नमवत इंग्लंडची अंतिम फेरीत धडक

डेन्मार्कला नमवत इंग्लंडची अंतिम फेरीत धडक

जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेल्या युरो कप फुटबॉल स्पर्धेमध्ये अंतिम दोन संघ निश्चित झाले आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत डेन्मार्कला नमवत इंग्लंडने अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे आता इंग्लंड आणि इटली या दोन संघांमध्ये स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.

बुधवार, ७ जुलै रोजी इंग्लंड आणि डेन्मार्क या दोन संघांमध्ये युरो कप स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना रंगला. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री १२.३० वाजता हा सामना सुरु झाला. इंग्लंडचा संघ हा सुरवातीपासूनच या स्पर्धेतील एक दादा संघ समजला जात होता. तर उपांत्य फेरीत धडक मारणारा डेन्मार्कचा संघ हा साऱ्यांसाठीच आश्चर्याचा धक्का होता. पहिल्याच सामन्यात संघातील स्टार खेळाडू एरिक्सन हा जखमी झाल्यामुळे डेन्मार्कचा संघाला जोरदार धक्का बसला होता. पण तरीही या लढवय्या संघाने उपांत्य फेरी गाठली. त्यांची हीच लढवय्या वृत्ती उपांत्य फेरीच्या सामन्यातही दिसून आली.

हे ही वाचा:

एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल

हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन

सीडी लावण्याची भाषा करणाऱ्या खडसेंची तब्येत बिघडली

अरेरे! पोलिसांनी केलेल्या मारहाणीत दिव्यांगाला गमवावे लागले प्राण

बुधवारच्या सामन्यात ३० व्या मिनिटाला गोल करत डेन्मार्कने आघाडी मिळवली. पण ही आघाडी त्यांना फार काळ टिकवता आली नाही. ३९ व्या मिनिटाला डेन्मार्कने स्वयंगोल नोंदवला आणि इंग्लंडला सामन्यात वापसी करून दिली. त्यांनतर ९० मिनिटांचा खेळ होईपर्यंत एकाही संघाला गोल नोंदवता आला नाही. त्यामुळे ३० मिनिटांचा अतिरिक्त खेळ खेळवला गेला. या वेळेत इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याने गोल करत संघाला विजयी बढत मिळवून दिली. ज्याच्या आधारे इंग्लंड संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Exit mobile version