इंग्लंड, युक्रेनची उपांत्यपूर्व फेरीत धडक

इंग्लंड, युक्रेनची उपांत्यपूर्व फेरीत धडक

युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या राऊंड ऑफ १६ चे अखेरचे दोन सामने मंगळवार, २९ जून रोजी पार पडले. यापैकी पहिल्या सामन्यात इंग्लंडने जर्मनीचा २-० असा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात युक्रेनने स्विडनला हरवत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या दोन सामन्यांच्या निकालामुळे युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील आठ संघ निश्चित झाले आहेत.

मंगळवारी झालेल्या युरो कप फुटबॉल सापर्डेच्या पहिल्या सामन्याचे वर्णन हे अनेक फुटबॉल चाहत्यांनी ‘दुसरे विश्व युद्ध’ असे केले. कारण इंग्लंड विरुद्ध जर्मनी हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. तुल्यबळ असणाऱ्या या दोन्ही संघांमध्ये सुरुवातीपासूनच विजयासाठी चढाओढ सुरू होती. दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी प्रयत्नशील होते पण गोल करण्यात मात्र त्यांना अपयश येत होते. अशातच सामन्याचा पहिला हाल्फ हा बरोबरीत संपला.

सामन्याचा दुसरा हाल्फही साधारण तसाच सुरू होता, पण ७५ व्या मिनिटाला इंग्लंडचा स्टार खेळाडू रहीम स्टर्लिंग याने गोल करत इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सामन्यावर पूर्णपणे इंग्लंड संघाची पकड दिसून आली. इंग्लंडचा आघाडी खेळाडू आणि संघाचा कर्णधार हॅरि केन याने ८६ व्या मिनिटाला वाढवली आणि संघाचा विजय निश्चित केला.

हे ही वाचा:

कोवॅक्सिन अल्फा आणि डेल्टा व्हेरियंटवरही प्रभावी

महिना १०० कोटी खंडणी गोळा करण्याआधी केंद्राला विचारले होते काय?

निर्बंध झुगारत नवी मुंबईत दुकानं उशिरा पर्यंत सुरूच

विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार?

तर शनिवारच्या दुसऱ्या सामन्यात युक्रेनने स्विडनचा २-१ असा पराभव केला. सामन्याच्या २७ व्या मिनिटाला युक्रेनने पहिला गोल करत या सामन्यात आघाडी घेतली होती. पण ती त्यांना फार काळ टिकवता आली नाही. तर ४० व्या मिनिटाला गोल नोंदवत स्वित्झर्लंडने बरोबरी साधली आणि सामन्याचा पहिला हाल्फ संपला तेव्हा दोन्ही संघ १-१ गोल करून बरोबरीत होते.

सामन्याच्या दुसऱ्या हाल्फमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही. त्यामुळे स्पर्धेच्या नियमानुसार ३० मिनिटांचा अतिरिक्त खेळ खेळला गेला. यात अखेरच्या मिनिटाला नाट्यमयरित्या गोल करत युक्रेनने सामन्यात विजयी आघाडी घेतली. या गोलमुळे २-१ असा सामना जिंकत त्यांनी पुढच्या फेरीत मजल मारली आहे.

Exit mobile version