कोलकात्यात शवांना हाताळण्याच्या कामासाठी तब्बल ८ हजार अर्ज आले आहेत. पण हे अर्ज कुणी केले आहेत, हे कळल्यावर तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही.
सरकारी रुग्णालयात शवांना हाताळण्यासाठी प्रयोगशाळा सहाय्यकाच्या सहा पदांकरिता तब्बल ८ हजार अर्ज आले आहेत. त्यात इंजीनियर, पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर आदिंचा समावेश आहे. शवागारात प्रयोगशाळा सहाय्यकाला ‘डोम’ असेही म्हटले जाते. नीलरत्न सरकार चिकित्सा कॉलेजसह रुग्णालयातील फॉरेन्सिक मेडिसिन अँड टॉक्सीकोलॉजी विभागात ‘डोम’च्या सहा पदांसाठी १०० इंजीनियर, २२०० पदवीधर व ५०० पदव्युत्तर पदवीधरांनी अर्ज केले आहेत. अर्ज केलेल्यांपैकी ८४ महिला उमेदवार आहेत. त्यांच्यासह ७८४ जणांना ऑगस्ट महिन्यात होत असलेल्या लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात आले आहे.
हे ही वाचा:
राज कुंद्रा राहणार न्यायालयीन कोठडीतच
आता ‘हा’ भारतीय खेळाडू कोरोना पॉसिटीव्ह
शरद पवारांच्या वक्तव्यावर फडणवीस ‘हे’ बोलले
कोकणासाठी पुढचे ५ दिवस धोक्याचे
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. त्यासाठी अर्हता किमान ८वी उत्तीर्ण आहे तर वय १८ ते ४० वर्षे इतके आहे. मासिक वेतन १५ हजार मिळणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक अर्जदार हे जाहिरातीत दिलेल्या अर्हतेपेक्षाही जास्त शिकलेले आहेत. असे प्रथमच घडले आहे. अन्यथा, ज्या लोकांच्या घरातील कुणीतरी ‘डोम’ म्हणून काम करतात त्याच घरातून या पदांसाठी अर्ज केले जातात.
सध्या इंजीनियरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर नोकऱ्या उपलब्ध होणे कठीण झाले आहे. त्यामुळे शिक्षणापेक्षाही कमी अर्हतेच्या नोकऱ्यांसाठी इंजीनियर्सना अर्ज करावे लागत आहेत.