मध्य प्रदेशमध्ये गुरुवारी लोकायुक्त पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या कारवाईत मध्य प्रदेश पोलिस गृहनिर्माण महामंडळाच्या प्रभारी सहाय्यक अभियंता (कंत्राटी) हेमा मीणा यांच्या बिलखिरिया येथील घरातून मोठी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ३० हजार रुपये पगार मिळणाऱ्या हेमा यांच्या घरातून लाखो रुपयांच्या वस्तू जप्त केल्या. त्यात अजब बाब म्हणजे या वस्तूत एक ३० लाखांचा टीव्ही आहे.
लोकायुक्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सहाय्यक अभियंता हेमा मीणा यांचे मासिक वेतन ३० हजार रुपये आहे. पण, त्यांनी १३ वर्षांच्या सेवेत आपल्या उत्पन्नापेक्षा २३२% अधिक संपत्ती गोळा केली आहे. पगारानुसार हेमा यांची संपत्ती जास्तीत जास्त १८ लाख रुपये असायला हवी होती. परंतु, त्यांच्याकडे याहून अधिक माया आढळून आलेली आहे.
विशेष म्हणजे २० हजार स्क्वेअर फूटात पसरलेल्या या कॅम्पसमध्ये डझनभर कर्मचाऱ्यांशी बोलण्यासाठी हेमा मीना वॉकी-टॉकीचा वापर करत होती. एवढेच नव्हे तर लोकायुक्त पोलिसांच्या छाप्यात कंत्राटी अभियंत्याच्या बंगल्यातून ब्रेड बनवण्याची मशीनही सापडली आहे. २ लाख ५० हजार रुपये किमतीच्या या मशिनचा वापर कुत्र्यांसाठी ब्रेड बनविण्याकरिता केला जात होता.
३० लाख किमतीचा फक्त एक टीव्ही
हेमा मीना यांचा बंगला आलिशान वस्तूंनी भरलेला होता. महिन्याला ३० हजार रुपये पगार मिळणाऱ्या कंत्राटी अभियंत्याच्या खोलीतून ३० लाखांचा टीव्ही जप्त करण्यात आला. सध्या टीव्हीचा वापर त्या करत नव्हत्या. तो बॉक्समध्ये पॅक होता. तसेच या बंगल्यातून २ ट्रक, १ टँकर आणि महिंद्रा थारसह १० महागड्या गाड्याही सापडल्या आहेत.
हेही वाचा :
“नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला ही चूक”
“सुषमा अंधारेंनी शरद पवारांऐवजी ठाकरेंसमोर रडावं”
वाढताहेत उन्हाच्या झळा, मुंबईकरांनो पुढील दोन दिवस तब्येत सांभाळा!
इम्रान खान यांना दिलासा, पण भविष्य अंध:कारमय
सोलर पॅनल तपासण्याच्या बहाण्याने पथकाचा बंगल्यात प्रवेश
लोकायुक्त पोलिसांचे ५० जणांचे पथक हेमा मीणा यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोहोचले असता बंगल्यावर तैनात सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले. साध्या वेशात आलेल्या पथकातील सदस्यांनी स्वत:ला पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच बंगल्यात लावलेले सोलर पॅनेल तपासणीच्या बहाण्याने ते घरात घुसले. यानंतर आत असलेल्या हेमा मीना यांना एका खोलीत बसवून त्यांचा मोबाइल जप्त करून कारवाई सुरू करण्यात आली.
छाप्यात काय आढळले?
- भोपाळजवळील बिलखिरिया येथे बंगला, फार्म हाऊस, लाखो रुपयांची कृषी अवजारे, डेअरी फार्म
- फार्म हाऊसवर अनेक परदेशी जातीचे कुत्रे
- सुमारे ६० ते ७० विविध जातींच्या गायी
- टीव्ही, सीसीटीव्ही मॉनिटर, वॉर्डरोब, ऑफिस टेबल, फिरती खुर्ची
- महागडी दारू, महागडी सिगारेट सारख्या वस्तू
- थार गाडी, २ ट्रक, १ टैंकर, १० महागड्या गाड्या