24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषमहापालिका अभियंत्यांच्या बढतीवरून खडाजंगी

महापालिका अभियंत्यांच्या बढतीवरून खडाजंगी

Google News Follow

Related

महापालिकेच्या १३२ अभियंत्यांना बढती देण्याबाबतचा प्रस्ताव सादर होण्याची शक्यता आहे. तसेच महापालिकेच्या १०५ सहाय्यक अभियंत्यांना कार्यकारी अभियंतापदी बढती देण्याचा आणि २७ कार्यकारी अभियंत्यांना उपप्रमुख अभियंतापदी बढती देण्याच्या प्रस्तावाला, स्थापत्य शहर समितीने मान्यता दिली आहे. महापालिका सभागृहात हा प्रस्ताव मंजूर केल्यास, सत्ताधारी पक्षाला वेगळे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिला आहे. मंजुरीवरुन मोठे वादळ उठण्याची शक्यता असून, एक दिवस आधीच हा प्रस्ताव समितीपुढे सादर करुन त्याला सत्ताधारी शिवसेनेने मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव मंजूर करताना विरोधी पक्षांना कोणत्याही प्रकारे विचारात न घेता केवळ सभागृह नेत्यांच्या सांगण्यानुसारच हा प्रस्ताव मंजूर केल्याने, आता विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सहाय्यक अभियंता ते कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता ते उपप्रमुख अभियंता या पदावरील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव बैठकीच्या एक दिवस आधी पाठवण्यात आला. परंतु प्रस्ताव मंजूर करण्याबाबत सत्ताधारी पक्षाने चर्चा केलेली नाही. याबाबत आपल्याकडे अनेक तक्रारी येत असून, यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी म्हटले आहे. मात्र, हा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचाही घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे ही शक्यता अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. समिती अध्यक्षांनी, आपण सभागृह नेत्यांच्या निर्देशानुसार हा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती आपल्याला दिल्याचे रवी राजा यांनी सांगितले.

हे ही वाचा:

महिला भिकारणीला फेकले स्कायवॉकवरून 

२६ जुलैनंतर १६ वर्षे तीच स्थिती

मरीन ड्राईव्हमध्ये ८ वकिलांविरुद्ध लैगिंग अत्याचार, खंडणीचा गुन्हा

कंगना प्रकरणात जावेद अख्तर यांना कोर्टाने काय सुनावले?

विविध संवर्गातील १०५ सहाय्यक अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती देण्याचा आणि विविध संवर्गातील २७ कार्यकारी अभियंत्यांना उपप्रमुख अभियंता पदावर पदोन्नती देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. विशेष म्हणजे समितीपुढे कोणतेही मंजुरीला येणारे प्रस्ताव तीन दिवस आधी पटलावर ठेवणे आवश्यक असते. परंतु हे दोन्ही प्रस्ताव बैठकीच्या काही तास आधीच सदस्यांना पाठवून गुरुवारी झालेल्या बैठकीत कोणत्याही चर्चेविना ते मंजूर करण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा