कुवेतमधील आगीतील ४० मृतांमध्ये केरळमधील पाच जणांचा समावेश!

५० हुन अधिक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

कुवेतमधील आगीतील ४० मृतांमध्ये केरळमधील पाच जणांचा समावेश!

कुवेतमधील एका बांधकाम कंपनीतील श्रमिक राहात असलेल्या सहा मजली इमारतीला बुधवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ४९ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये बहुतांश भारतीयांचा समावेश आहे, ५०हून अधिक जखमींना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. मृतांपैकी पाचजण केरळमधील आहेत.

कोल्लम जिल्ह्यातील उमरुद्धीन शामीर याच्या कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूची बातमी समजल्यावर त्यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. शामीर हा गेली पाच वर्षे कुवेतमध्ये चालक म्हणून काम करतो. त्याचे शव भारतात आणण्यासाठी सध्या शामीरचे कुटुंबीय आणि सरकारशी सल्लामसलत सुरू आहे. शामीर नऊ महिन्यांपूर्वीच सुट्टीमध्ये केरळला येऊन गेला होता.

कोल्लम जिल्ह्यातील आणखी एका व्यक्तीच्या नशिबी हेच आले. त्याचे नाव २९ वर्षीय सजन जॉर्ज असे आहे. त्याचा मृतदेह बुधवारी या इमारतीमध्ये आढळला. सजन हा एम टेक ग्रॅज्युएट असून महिनाभरापूर्वीच त्याला कुवेतमधील नोकरी मिळाली होती. तो तेथील कंपनीत ज्युनिअर मेकॅनिकल इंजिनीअर म्हणून काम करत होता.

हे ही वाचा:

मुबिना युसूफकडून हिंदू मुलीवर धर्मांतर करून तिच्या मुस्लिम मित्राशी लग्न करण्यासाठी दबाव!

३०० कोटींच्या मालमत्तेसाठी सासऱ्याची हत्या; मारेकऱ्यांना एक कोटीची सुपारी!

हत्या करण्यासाठी फॅन क्लबच्या सदस्याचा वापर!

संत, धर्माचार्यांकडून ओम प्रमाणपत्राला भक्कम समर्थन, मोहीमेला दिले शुभ आशीर्वाद

केरळमधल्यास कोट्टायम येथील पांपेडी यथे राहणारा स्टिफन अब्राहम साबू हादेखील या आगीत मृत्युमुखी पडला. २९ वर्षांचा साबू हा कुवेतमध्ये इंजिनीअर होता. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच त्याची आई शर्ली साबू, भाऊ फेबिन आणि केविन यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्टिफनचा भाऊ फेबिनही कुवेतमध्येच नोकरी करतो.

कासरगोडमधील आणखी दोघांचा मृतांमध्ये समावेश आहे. त्यातील केलू पोन्मालेरी हा थिरकरीपूरचा रहिवासी एनबीटीसी ग्रुपमध्ये प्रोडक्शन इंजिनीअर म्हणून काम करत होता. त्याच्या मागे पत्नी केएनपणी आणि दोन मुले आहेत. केएन मणी या ग्रामपंचायतीमध्ये काम करतात.तर, ३४ वर्षीय रंजीथ याचाही या आगीत होरपळून मृत्यू झाला. तो गेल्या १० वर्षांपासून तेथे काम करत होता.दुर्घटना घडलेली इमारत एनबीटीसी या कुवेतमधील सर्वांत मोठ्या बांधकाम क्षेत्रातील कंपनीने उभारली होती.

Exit mobile version