पश्चिम बंगालमधील संदेशाखाली येथे गुरुवारी(१४ मार्च) पहाटे ईडीची कारवाई होताना दिसत आहे. संदेशाखाली येथे अटक करण्यात आलेला टीएमसी नेता शाहजहान शेखच्या अनेक ठिकाणी ईडीचे पथक सकाळपासून छापे टाकत आहे. शाहजहानशिवाय संदेशाखाली येथील त्याच्या अनेक निकटवर्तीयांच्या घरांवर ईडीची टीम छापेमारी करत असल्याची माहिती आहे.
शाहजहान शेख विरुद्ध लैंगिक अत्याचार आणि जमीन बळकावल्याचा आरोप आहे.दरम्यान, जमीन बळकावल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून ही कारवाई करण्यात येत आहे.ईडीच्या पथकाकडून शाहजहान शेखच्या अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.शहाजहान शेखच्या चौकशीदरम्यान ईडीला आर्थिक व्यवहारांची माहिती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.त्यावरून हा छापा टाकण्यात येत आहे. संदेशाखाली येथे सध्या ४ ठिकाणी छापे टाकण्यात येत असून यादरम्यान केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे.
हे ही वाचा:
‘मंत्री नसतो तर त्यांचे तुकडेतुकडे केले असते’
पिटबुल, अन्य धोकादायक जातीच्या श्वानांवर बंदीची केंद्राची शिफारस!
अदानी उद्योगाच्या समभागांचे एका दिवसात एक लाख कोटीचे नुकसान!
“नागरिकत्व दुरुस्ती कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही”
दरम्यान, सीबीआयचे एक पथक बुधवारी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशाखाली येथे गेले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने शाहजहानचा भाऊ आलमगीर शेख याच्या घरी पोहोचले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आलमगीर घरी उपस्थित नव्हता आणि त्याच्या कुटुंबीयांना चौकशीची नोटीस देण्यात आली आहे. शाहजहानच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या इतर काही लोकांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे.सध्या शाहजहान शेख हा सीबीआयच्या ताब्यात असून
त्याची कसून चौकशी सुरु आहे.