अवैध खाणकाम प्रकरणी लोकदलचे माजी आमदार दिलबाग सिंग अटकेत

३०० काडतूस,१०० हून अधिक दारूच्या बाटल्या,५ कोटी रुपये रोख,५ किलो सराफा जप्त

अवैध खाणकाम प्रकरणी लोकदलचे माजी आमदार दिलबाग सिंग अटकेत

हरियाणातील अंमलबजावणी संचालनालयाने अवैध खाणकाम प्रकरणी आणि ई-वाहतूक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार दिलबाग सिंग आणि त्यांचे सहकारी कुलविंदर सिंग यांना अटक केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिलबाग सिंग आणि कुलविंदर सिंग या दोघांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) ताब्यात घेण्यात आले आहे आणि दोघांना स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे.

केंद्रीय एजन्सीचे ४ जानेवारीपासून इंडियन नॅशनल लोक दल (INLD) आणि सोनीपतमधील काँग्रेसचे आमदार सुरेंदर पनवार यांच्या घरावर छापे टाकण्याचे काम सुरु होते, ज्याचा आज शेवट झाला.अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दिलबाग सिंग आणि त्याच्या साथीदारांच्या घरावर ईडीच्या झडतीदरम्यान, अवैध विदेशी शस्त्रे, ३०० काडतूस , १०० हून अधिक दारूच्या बाटल्या आणि ५ कोटी रुपये रोख, ४/५ किलो सराफा जप्त करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानात झालेल्या स्फोटात पाच पोलीस ठार

मालदीवमधले लोकंही गुगलवर सर्च करतायत ‘लक्षद्वीप’

कर्नाटक काँग्रेसने २२ जानेवारीला मंदिरांना विशेष पूजा करण्याची दिली सूचना!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळाले अयोध्येचे निमंत्रण…

याशिवाय बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित अनेक कागदपत्रे भारत आणि परदेशातील मालमत्तांच्या संख्येसह जप्त करण्यात आली आहेत. माजी आमदार दिलबाग सिंह आणि आमदार सुरेंद्र पनवार यांच्या बेकायदेशीर खाणकाम आणि बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याप्रकरणी हरियाणात २० ठिकाणी ईडीचे ५ दिवस शोध सुरू होते. उल्लेखनीय आहे की, ईडी दिलबाग सिंगविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत आहे. अवैध खाणकामाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अनेक ठिकाणी छापे टाकले होते.

दिलबाग सिंग हे इंडियन नॅशनल लोकदलाचे नेते आहेत. २००९-१४ दरम्यान ते यमुनानगरचे आमदार होते. २०१९ च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत दिलबाग सिंह यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. निवडणुकीत ते हरियाणातील सर्वात श्रीमंत उमेदवार होते. दिलबाग सिंग यांनी ३४ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. दिलबाग सिंग हे कुरुक्षेत्र विद्यापीठातून १९९४ सालचे पदवीधर आहेत. त्यांचा वाहतूक आणि खाणकामाचा व्यवसाय आहे. दिलबाग सिंह हे इंडियन नॅशनल लोक दल नेते अभय सिंह चौटाला यांचेही जवळचे मित्र आहेत.

Exit mobile version