४२० कलमाचा अंत आता फसवणुकीसाठी कलम ३१८ !

४२० कलमाचा अंत आता फसवणुकीसाठी कलम ३१८ !

समाजात गैरकृत्य करणारे, फसवणूक करणाऱ्या लोकांना ४२० म्हणण्याची प्रथा गेल्या १६४ वर्षांपासून सुरु होती. त्याचे कारण होते ते म्हणजे फसवणुकीला ४२० कलम हे भारतीय दंड संहितेनुसार लावले जात होते. मात्र आता कलम राहिले नसून नव्या कायद्यानुसार ते ३१८ झाले आहे. त्यामुळे आता फसवणूक करणाऱ्या लोकांना ४२० असे म्हणण्याची सवय आता बदलावी लागणार आहे. यावर आता समाज माध्यमातही चर्चा सुरु झाली आहे.

‘बेईमान फसवणूक’ साठी भारतीय दंड संहितेमध्ये आता बदल करण्यात आले आहेत. ४२० कलम हे १८६० मध्ये संहिता लागू झाल्यापासूनचे होते. १६४ वर्षानंतर त्यात बदल करण्यात आले आहेत. आजच १ जुलै पासून ते लागू करण्यात आले आहे. यावर एक एक्स वापरकर्त्याने पोस्ट केली आहे की कलमाचा केवळ भारतीय कायदेशीर व्यवस्थेतच नव्हे तर त्याचा लोकप्रिय, प्रासंगिक आणि विनोदी वापरात सुद्धा बदल करावा लागेल.

हेही वाचा..

विधान परिषदेसाठी भाजपाकडून पंकजा मुंडेंसह सदाभाऊ खोत यांना संधी

फेक नरेटिव्ह तयार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून पेपरफुटीचा कायदा आणणार

एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेजारच्या महिलेला घातला सात लाखांचा गंडा

स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी नवा कायदा करणार

ज्येष्ठ वकील आणि खासदार महेश जेठमलानी यांनी आधी सांगितले की कलम ४२० हे प्रत्येकाच्या मनात ठसले आहे. कलम ४२० हे फसवणूक आणि अप्रामाणिकपणा याबद्दलचे आहे. केवळ देशाच्या गुन्हेगारी न्याय व्यवस्थेचा आधारस्तंभच नव्ह तर भारतीय लोकप्रिय संस्कृतीवर देखील अमिट छाप या कलमाने सोडली आहे. ४२० कलमाचा ठसा कायदा आणि न्यायाच्या पलीकडे विस्तारलेला, धूर्त किंवा कपटी व्यक्तीचे वर्णन करण्यासाठी वापरला गेला, जिथे राजकारण्यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांवर अप्रामाणिकपणा आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यासाठी हा शब्द वापरला होता.

१९९७ मध्ये रॉबिन विल्यम्सच्या मिसेस डाउटफायर चाची ४२० च्या रिमेकनंतर बॉलीवूडमध्ये सेक्शन ४२० अधिक लोकप्रिय झाला. येथे कमल हासन घटस्फोटानंतर आपल्या मुलीच्या जवळ राहण्यासाठी स्त्री नानी, लक्ष्मी गोडबोलेचा वेश धारण करतो. पंजाबी पॉप स्टार बोहेमियाने देखील त्याच्या त्याच नावाच्या एका गाण्यात सेक्शन ४२० चा संदर्भ दिला आहे. कलम ४२० चा अंत होत असताना त्याचा सांस्कृतिक महत्व आणि प्रभाव लवकर नाहीसा होण्याची शक्यता नाही.

Exit mobile version