दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी भागात सुमारे ४० तासांनंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमधील चकमक संपली आहे.सोमवारी रात्री या भागात बासित अहमद दार, फहीम अहमद बाबा आणि मोमीन हे तीन दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात कारवाई सुरू केली होती.आता ही चकमक संपली आहे.भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने ट्विटकरून याची माहिती दिली आहे.
सोमवारी सुरु झालेली चकमक आता संपली आहे.या चकमकीत सुरक्षा दलाने तीन दहशतवादी टिपले.भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने ट्विट करत म्हटले की, कुलगामच्या रेडवानी पाइन जनरल भागात ६-७ मे च्या मध्यरात्री सुरू करण्यात आलेली संयुक्त कारवाई सुमारे ४० तासांच्या सतत देखरेखीनंतर आज गुरुवार (९ मे) संपली आहे. तसेच तीन दहशतवादी मारले गेले आहेत.दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
‘केरळचे राज्यपाल आरिफ खान प्रभू राम चरणी नतमस्तक’
आता गांजा लावून पाकिस्तान गाठणार आर्थिक उच्चांक
मालदीवची अक्कल ठिकाण्यावर आली; भारतीयांसाठी पायघड्या
चारधाम यात्रेला दणदणीत प्रतिसाद
दरम्यान, या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलं.यामध्ये मंगळवारी झालेल्या चकमकीत टीआरएफ कमांडर बासित अहमद दार आणि त्याचा सहकारी फहीम अहमद बाबा मारले गेले.चकमकीत ठार झालेला बासित अहमद दार याच्यावर एनआयएने १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.२०११ मध्ये त्याच्यावर कुलगाममध्ये दोन बिगर स्थानिक मजुरांच्या हत्येचा आरोप होता.