जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील कठुआ-बसंतगड सीमेजवळ बुधवारी (११ सप्टेंबर) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सुरक्षा दलांकडून अजूनही दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीर निवडणुकीपूर्वी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या एका गटाच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे लष्कर आणि पोलिसांचे संयुक्त पथक खांद्रा टॉपच्या दिशेने रवाना झाले आणि शोध मोहीम सुरु झाली.याच दरम्यान परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांनी पथकावर गोळीबार सुरु केला, त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले.
हे ही वाचा :
वॉशिंग्टनमध्ये राहुल गांधीनी ओकली गरळ !
‘वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक, ट्रेनच्या खिडकीच्या काचा फुटल्या’
काँग्रेसचे खोटे नरेटिव्ह राहुल गांधींमुळे पुरते स्पष्ट !
हिंदूंबाबत खोटी माहिती पसरवणाऱ्या माजीद फ्रीमनला २२ आठवडे तुरुंगवासाची शिक्षा
मिडिया माहितीनुसार, पथकाला माहिती मिळताच चार आतंकवाद्यांना घेराव घालण्यात आला. या चकमकीत दोन दहशतवादी ठार करण्यात आले. अजूनही सुरक्षा पथकाकडून शोध मोहीम सुरु आहे. अतिरिक्त फौज देखील तैनात करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा पथकाकडून खबरदारी घेतली जात आहे.