उधमपूरमध्ये दोन-तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले!

परिसरात नाकाबंदी

उधमपूरमध्ये दोन-तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले!

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उधमपूर जिल्ह्यातील बसंतगडमध्ये ही चकमक सुरू आहे. लष्कर आणि राज्य पोलिसांच्या पथकाने दहशतवाद्यांविरोधात मोहीम हाती घेतली असून दोन ते तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने घेरल्याची माहिती आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बसंतगडच्या पाथी नाला खानेड भागात सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरु होती. शोधमोहिमेदरम्यान गोळीबाराचा आवाज ऐकू येवू लागला. यानंतर शोध मोहीम अधिक सुरु केली. यावेळी दोन्ही बाजूने चकमक सुरु झाली. सुरक्षा दलाने दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरण्यात आल्याची माहिती आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु आहे.

हे ही वाचा:

बांगलादेशनंतर ब्रिटनमध्ये हिंसाचार; प्रवाशांसाठी सूचना जारी

बांगलादेशच्या विरोधी पक्षनेत्या खालिदा झिया यांची तुरुंगातून सुटका !

अगदी कमी वेळेत हसिना यांनी केली भारतातील आश्रयाबद्दल विनंती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित !

दरम्यान, या घटनेच्या एक दिवसापूर्वी अनंतनागमध्ये सुरक्षा दलाने आतंकवाद्यांना मदत करणाऱ्या तिघांना अटक केली. यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. दाऊद अहमद दार, इम्तियाज अहमद रेशी आणि शाहिद अहमद दार अशी अटक केलेल्या दहशतवादी सूत्रधारांची नावे आहेत. तिघेही हसनपोरा तवेला येथील रहिवासी आहेत.

Exit mobile version