छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, १२ नक्षलवादी ठार!

सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरु 

छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, १२ नक्षलवादी ठार!

छत्तीसगडच्या दक्षिण बस्तर भागात गुरुवारी (१६ जानेवारी) सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. या प्रदेशातील घनदाट जंगली भागात सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाकडून चालवण्यात आलेल्या शोधमोहिमे दरम्यान चकमक झाली.

सकाळी ९ वाजता चकमकीला सुरवात झाल्याची माहिती आहे. या कारवाईत तीन जिल्ह्यांतील जिल्हा राखीव रक्षक (DRG), सीआरपीएफच्या जंगल वॉरफेअर युनिटच्या पाच बटालियन, COBRA (कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट अॅक्शन) आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाची (CRPF) २२९ वी बटालियन सहभागी होती. या कारवाई दरम्यान १२ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले.

हे ही वाचा : 

सैफ अली खानवर हल्ला अन पाकिस्तानला जखम, माजी मंत्री म्हणतो, भारतात मुस्लिम…

मुंडे यांच्या गच्छंतिचे दोन संकेत…

महाकुंभ: आतापर्यंत ६.२५ कोटी भाविकांनी संगमात केले स्नान!

सैफचा हल्लेखोर सीसीटीव्हीत दिसला, पायऱ्या उतरतानाचा व्हीडिओ

यापूर्वी, बिजापूर जिल्ह्यात झालेल्या आयईडी स्फोटात दोन सैनिक जखमी झाले होते. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा म्हणाले की, हे नक्षलवाद्यांचे भ्याड कृत्य आहे. त्यांनी सर्वत्र आयईडी पेरले आहेत. यामध्ये सुरक्षा कर्मचारी, नागरिक आणि प्राणी देखील मारले जात आहेत. काल २ सुरक्षा कर्मचारी “आयईडी स्फोटात जखमी झाले. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि दोघेही सुरक्षित आहेत.”

दरम्यान, १२ जानेवारी रोजी बिजापूरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन महिलांसह पाच नक्षलवादी ठार झाले होते. ६ जानेवारी रोजी, बस्तर विभागातील बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी पोलिसांच्या वाहनावर केलेल्या मोठ्या आयईडी स्फोटात आठ सुरक्षा कर्मचारी आणि एक चालक हुतात्मा झाले. जवानांच्या मृत्युबद्दल शोक व्यक्त करताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत भारतातून नक्षलवादाचे उच्चाटन करण्याचे वचन दिले आणि “आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही” असे सांगितले.

Exit mobile version