१० लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी छत्तीसगडमध्ये ठार, जवानही हुतात्मा!

छोटेबेठिया भागातील हिंदूरच्या जंगलात झाली चकमक

१० लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी छत्तीसगडमध्ये ठार, जवानही हुतात्मा!

छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये मोठी चकमक झाली असून यामध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. छोटेबेठिया भागातील हिंदूरच्या जंगलात ही चकमक झाल्याची माहिती आहे.नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला आहे तर एका नक्षलवाद्याला ठार करण्यात आले आहे.ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यावर तब्बल १० लाख रुपयांचे बक्षीस होते.या भागातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले आहे.

छत्तीसगढमधील कांकेर जिल्ह्यातील छोटेबेठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिदूरच्या जंगलात माओवाद्यांची उपस्थिती असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी माहितीच्या आधारे रविवारी पोलीस दल कारवाईसाठी रवाना झाले.या मोहिमेदरम्यान कांकेर डीआरजी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली.

हे ही वाचा:

भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रोसेवेचे उद्घाटन मोदी करणार

शाहबाज शरीफ यांचा आळवला काश्मीर राग!

निवडणुकीत दारुण पराभव दिसू लागल्याने ठाकरेंचं ईव्हीएमवर बोट!

गौतम गंभीरनंतर खासदार डॉ.हर्षवर्धन यांचा राजकारणाला रामराम!

हिदूरच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये सुमारे एक तास ही चकमक सुरू होती.या चकमकीत बस्तर फायटरचे कॉन्स्टेबल रमेश कुरेठी हे हुतात्मा झाले.चकमकी नंतर घटनास्थळी मोठया प्रमाणात नक्षल साहित्य पोलीस पथकाने जप्त केलं.

दरम्यान, पोलीस दल, BSF, डीआरजी पथकाकडून आजूबाजूच्या परिसरात शोधकार्य सुरू असताना गणवेशधारी माओवाद्याचा मृतदेह सापडला.पथकाने त्याचा मृतदेह आणि एक AK-४७ जप्त केली.एबीपी मराठीने दिलेल्या बातमीनुसार, पथकाला सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. परतापूर माओवादी एलजीएस कमांडर एसीएम नागेश असे मृत माओवाद्याचे नाव असून कोडलियार पोलीस स्टेशन कोहकामेट्टा जिल्हा नारायणपूर येथील तो रहिवासी आहे.माओवादी एसीएम नागेशवर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

Exit mobile version