नारायणपूरमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, २ आयईडी बॉम्ब जप्त !

नक्षलवाद्यांचे पलायन

नारायणपूरमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, २ आयईडी बॉम्ब जप्त !

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून साजरे करण्यात येत असलेल्या शहीद सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी बस्तर विभागातील नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीवर जवानांनी मोठी कारवाई केली आहे. नक्षलवाद्यांच्या अड्ड्यांवर छापा टाकताना जवानांनी जोरदार गोळीबार केला. सुमारे दीड तास नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू होती. दरम्यान, या चकमकीत कोणीही ठार झाल्याचे वृत्त नाही परंतु जवानांनी दावा केला आहे की, चकमकीत मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत.

यावेळी तेथून नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. तर दुसरीकडे, नक्षलवाद्यांनी पेरलेले पाच किलो वजनाचे पाइप बॉम्ब निष्क्रिय करण्यात जवानांना यश आले आहे. या पाईप बॉम्बद्वारे जवानांना इजा पोहचवण्याचा नक्षलवाद्यांचा इरादा होता, मात्र, या कारवाईत जवानांसोबत बॉम्ब स्कॉड पथक असल्यामुळे पाईप बॉम्बचा शोध लागला आणि दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार, माओवादी संघटनेच्या रावघाट एरिया कमिटीच्या नक्षलवाद्यांशी जवानांची चकमक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय देखील पूर्ण भरले

मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर अंकुश लावणार? संसदेत आणणार महत्त्वाचे विधेयक

योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोजर कारवाईचे मायावतींकडून कौतुक

पॅरिस ऑलिम्पिक समारोप समारंभात मनू भाकर भारतीय संघाची होणार ध्वजवाहक !

 

अनेक नक्षलवादी जखमी झाल्याचा सैनिकांचा दावा
नारायणपूरचे एसपी प्रभात कुमार म्हणाले की, नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीवरून डीआरजी, बीएसएफ, बस्तर फायटरच्या जवानांचे पथक शोधमोहिमेसाठी पाठवण्यात आले होते. घटनास्थळी कोहकामेटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कच्छपल टेकडीवर नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच, जवानांनी जोरदार गोळीबार केला, परंतु नक्षलवाद्यांनी डोंगर आणि जंगलाचा आधार घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. या चकमकीत अनेक नक्षलवाद्यांनाही गोळ्या घातल्याचा दावा जवानांनी केला आहे. कारण घटनास्थळी रक्ताचे डागही दिसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version