28 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषअंबरनाथमध्ये रेल्वे ट्रॅकवरून घसरली; मोठा अनर्थ टळला !

अंबरनाथमध्ये रेल्वे ट्रॅकवरून घसरली; मोठा अनर्थ टळला !

पाऊस सुरूही झाला नाही,तोच रेल्वे रुळावरून घसरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे

Google News Follow

Related

मध्य रेल्वेच्या अंबरनाथ स्थानकाजवळ लोकल रेल्वे रुळावरून घसरल्याने, मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे.आज रविवार असल्याने सरकारी कार्यालये आणि खाजगी कार्यालये बंद आहेत. तसेच मेगा ब्लॉक असल्याने लोकल रेल्वे मध्ये चाकरमान्यांची कमी प्रमाणात असलेली गर्दी पाहावयास मिळते.सुट्टी असल्याकारणाने आज चाकरमानी घरीच होते. वर्किंग डेच्या दिवशी जर ही घटना घडली असती तर चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले असते.

मुंबईमध्ये ठिकठिकाणी पावसाची सुरुवात झाली असून,मात्र म्हणावा तसा पाऊस सुरू झालेला नाही.तुरळक सरी पडत असल्याने कुठेही पाणी तुंबलेले नाही. असं असतानाही पाऊस सुरू होण्याआधीच मध्यरेल्वेची हाराकिरी सुरू झाली आहे.आज सकाळी अंबरनाथ येथे लोकल रेल्वे रुळावरून घसरली आहे. सुदैवाने ही लोकल संपूर्ण खाली होती. शिवाय मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक असल्याने लोकल सेवाही कमी करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

हे ही वाचा:

केरळ चित्रपट दिग्दर्शक रामसिंहन यांचा भाजपला रामराम, पण निष्ठा मोदींसोबत

युगांडामध्ये इसिसशी संबंधित संघटनेकडून शाळेवर दहशतवादी हल्ला

तिसऱ्या आघाडीसाठी जितनराम मांझी प्रयत्नशील? १९ जूनला निर्णय

मदरशात शिक्षण घेण्यासाठी बिहारमधून आलेल्या मुलांना परत पाठवले!

आज सकाळी ८.२५ वाजता ही लोकल अंबरनाथ येथे घसरली. लोकलचा एक डबा रेल्वे रुळावरून घसरला. ही लोकल रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कर्जतहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कर्जतकडे येणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. रेल्वे रुळावरून घसरल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचं काम सुरू केलं असून रेल्वे सेवा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

 

दरम्यान, पाऊस सुरु झाल्यानंतर रेल्वेला मोठा फटका बसतो, तसेच पावसामुळे तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे बंद पडत असते.मात्र, अजून पाऊस सुरूही झाला नाही तोच रेल्वे रुळावरून घसरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पाऊस सुरु नसतानाही रेल्वेची अशी अवस्था आहे, तर पाऊस सुरु झाल्यानंतर रेल्वेची अवस्था काय होईल हे पाहावं लागेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा