25 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषहे विश्रांतीगृह की छळछावण्या!

हे विश्रांतीगृह की छळछावण्या!

Google News Follow

Related

एसटीची ओळख आपल्या महाराष्ट्रात लालपरी अशी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपरा ही लालपरी गाठते. परंतु काम करून आल्यानंतर चालक वाहकांना साधी नीट विश्रांती मिळू नये ही मात्र शरमेची बाब आहे.

वाहक-चालक दमून आल्यानंतर त्यांनी मिळत असलेली वागणूक ही फारच निंदनीय आहे. विश्रांती कक्षांची दुर्दशा असल्यामुळे विश्रांती नकोच असे म्हणायची वेळ आलेली आहे. धूळ, अस्वच्छता असल्यामुळे विश्रांती घेण्यास नको, असे अनेकजण म्हणताहेत.

राज्य परिवहन मंडळाच्या आगारांमध्ये चालक, वाहकांच्या आरामासाठी विश्रांती कक्ष उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र वर्षांनुवर्षे हे विश्रांती कक्ष मात्र धूळ खात पडून आहेत. या कक्षांची देखभाल न झाल्यामुळे कोंडवाडा झालेला आहे. कुर्ला हे मुंबईतील एसटीचे सर्वात मोठे आगार आहे. परंतु इथला विश्रांती कक्ष म्हणजे केवळ घाणीचे साम्राज्य. प्लास्टर उडालेल्या भिंती, रंग उडालेली इमारत, घाण-दुर्गंधीने बरबटलेली स्वच्छतागृहे अशी अवस्था असलेल्या या विश्रांतीकक्षात एसटी कर्मचाऱ्यांना झोप घेणे तर दूरच, पाऊल ठेवणेही कठीण बनले आहे. रात्रपाळी करून किंवा दिवसभरात गाडी चालवल्यानंतर विश्रांती कक्षमध्ये आलेल्या चालक-वाहकाला जमिनीवर एखादी सतरंजी किंवा टॉवेल अंथरून झोपावे लागते. मुंबई सेंट्रल येथील आगाराची अशीच दुरावस्था आहे. विविध विभागांचे प्रमुख याठिकाणी बसतात. असे असूनही चालक वाहकांच्या नशिबी मात्र साधे चांगले विश्रांतीगृह असू नये ही शरमेची बाब आहे.

हे ही वाचा:

बेन स्टोक्सचा क्रिकेटला अलविदा?

चीन आज सैन्य मागे घेणार?

जिथे तिथे पेंग्विन गँगचा धुमाकूळ

सर्वसामान्यांचे नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

एसटी महामंडळाचा तोटा हा ठाकरे सरकारच्या काळात अधिक पटीने वाढला. कोरोना निर्बंधांमुळे एसटीची अवस्था डबघाईला आलेली आहे. सद्यस्थितीला एसटीचा एकूण तोटा हा ५ हजार ६०० कोटींपर्यंत गेलेला आहे. तसेच कर्मचारी वर्गाला आजही वेतन वेळेवर मिळत नसल्याची तक्रार आहे. एवढेच नाहीतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ६०० कोटींची मदत जाहीर केली. परंतु केवळ ३०० कोटींचा पहिला हप्ता महामंडळाला मिळालेला आहे. अदयाप जूनचा पगार एसटी कर्मचारी वर्गाला मिळाला नाही. त्यामुळे कर्मचारी हतबल झालेला आहे. एसटीचे वाहक-चालक दिवसरात्र सेवेत असूनही त्यांच्यासाठी साध्या सुविधा उपलब्ध असू नयेत ही दुर्दैवाची बाब आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा