मोबाईच्या बॅटरीमध्ये स्फोट झाल्याने विमानाची इमर्जन्सी लँडिंग

उदयपूरहून दिल्लीकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील घटना

मोबाईच्या बॅटरीमध्ये स्फोट झाल्याने विमानाची इमर्जन्सी लँडिंग

राजस्थानच्या उदयपूरमध्ये सोमवार, १६ जुलै रोजी मोठी विमान दुर्घटना टळली. मात्र, या घटनेत एअर इंडियाच्या एका विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. मोबाईच्या बॅटरीमध्ये स्फोट झाल्याने विमानाची इमर्जन्सी लँडिंग करावी लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर प्रवाशांना विमानातून उतरवून विमानाची योग्य तपासणी केल्यावर हे विमान दिल्लीकडे रवाना करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमान क्रमांक- ४७० मध्ये हा अपघात झाला. दुपारी एक वाजता या विमानाने उदयपूरहून दिल्लीकडे जाण्यासाठी उड्डाण केले. या विमानात एकूण १४० प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एका प्रवाशाच्या मोबाईल फोनची बॅटरी फुटली. हा फोनच्या बॅटरीचा स्फोट इतका जोरदार होता की विमानात बसलेले सर्व प्रवासी घाबरले. यावेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यानंतर विमानात उपस्थित असलेल्या कर्मचारी वर्गाने प्रवाशांमध्ये जाऊन चौकशी केली आणि यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

हे ही वाचा:

आकांक्षा – अभिजित अंतिम विजेते

देवेंद्र फडणवीसांच्या फोटोची ट्विटरवर चर्चा

कबड्डीपटू आकाश शिंदे, हरजित कौरचा सन्मान

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे एकाचा मृत्यू

विमानाच्या आतमध्ये प्रवाशाच्या मोबाईल फोनची बॅटरी फुटल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. वास्तविक, बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे विमानाच्या आत आग लागण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने हा निर्णय घेण्यात आला. पुढे तपासणी करून हे विमान दिल्ल्कडे रवाना करण्यात आले.

Exit mobile version