मुंबई विमानतळावर मुंबई- बंगळुरू विमानाचे आपत्कालीन लॅन्डिंग

मुंबई विमानतळावर मुंबई- बंगळुरू विमानाचे आपत्कालीन लॅन्डिंग

मुंबई विमानतळावर काही तांत्रिक बिघाडामुळे एका विमानाचे आपत्कालीन लॅन्डिंग करावे लागल्याची घटना घडली आहे. एअर इंडियाच्या मुंबई- बंगळुरू या विमानाचे आपत्कालीन लॅन्डिंग करावे लागले आहे. या विमानाचे एक इंजिन हवेत बंद पडल्याने हे लॅन्डिंग करण्यात आले. संबंधित घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून चौकशी करण्यात येत आहे.

एअर इंडियाचे मुंबई- बंगळुरू AI-639 या विमानाने मुंबई विमानतळावरून नियोजित वेळेनुसार उड्डाण केले. मात्र, उड्डाणानंतर साधरण २७ मिनिटानंतर वैमानिकाला विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा संदेश प्राप्त झाला. त्यानंतर वैमानिकाने सर्व शक्यता पडताळत तत्काळ मुंबई विमानतळावर सुरक्षित लॅन्डिंग केले.

हे ही वाचा:

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला

निखत झरीनची जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ‘सुवर्ण’ कामगिरी

आत्मनिर्भर 5G ची IIT मद्रासमध्ये यशस्वी चाचणी

“एअर इंडिया सुरक्षेला खूप महत्त्व देते आणि आमचे क्रू मेंबर अशी कठीण परिस्थिती हातळण्यास पारंगत असल्याचे म्हटले आहे. या घटनेनंतर विमानातील सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानाने बंगळुरुला रवाना करण्यात आले आहे. ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याचा तपास एअर इंडियाच्या अभियंत्यांकडून तपास करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे,” अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवाक्त्यांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version