सैन्य दलाच्या हेलीकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील सांगलीमध्ये हे लँडिंग करण्यात आल्याचे वृत्त आहे. सांगलीपासून २५ किलोमीटर अंतरावरील एरंडोली (ता. मिरज) येथे सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचे शनिवार, ४ मे रोजी सकाळी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लँडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
नेपाळ १०० रुपयांच्या नोटांवर छापणार नवा नकाशा; भारताच्या तीन भागांचा समावेश
‘तुम्हाला आधी रायबरेलीतून विजय मिळवावा लागेल’
कॅनडा पोलिसांकडून तीन भारतीयांना अटक
‘रोहित वेमुला दलित नाही’; पोलिसांनी केली मृत्यूच्या तपासाची फाइल बंद
सैन्य दलाचे हेलीकॉप्टर नाशिकहून बेळगावकडे जात होते. यावेळी हेलीकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच तातडीने हेलीकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले. एरंडोली येथे मोकळ्या शेतात सुरक्षितपणे हेलीकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील लोकांनी शेताकडे धाव घेतली यामुळे हेलीकॉप्टर पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. ग्रामस्थांना लष्कराचे जवान दूर थांबवण्याचा प्रयत्न करत होते. सुदैवाने या घटनेत जीवित आणि वित्तहानी झालेली नाही.