आधी छातीत कळ आल्याची तक्रार, नंतर बॅगेत बॉम्ब असल्याची माहिती

पुण्याहून दिल्लीला जात असलेल्या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

आधी छातीत कळ आल्याची तक्रार, नंतर बॅगेत बॉम्ब असल्याची माहिती

पुण्याहून दिल्लीला जात असलेल्या अकासा एअरलाईनच्या विमानाचे मुंबई विमानतळावर आपतकालीन लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विमानात घडलेल्या एका घटनेमुळे मुंबई विमानतळ प्रशासनाची धांदल उडाली होती. एका प्रवाशामुळे संपूर्ण प्रशासनाची गडबड उडालेली दिसत होती. सर्वात आधी या प्रवाशाने छातीत दुखत असल्याचा दावा केला. त्यामुळे विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. मात्र, प्रवाशाचं चेकअप सुरू असतानाच त्याने त्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा केला.

पुण्यावरून दिल्लीकडे जाणाऱ्या विमानाचे मेडिकल इमर्जन्सीमुळे मुंबई विमानतळावर लँडिंग करण्यात आले. विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने छातीत दुखत असल्याची तक्रार विमानातील क्रू मेंबर्सकडे केली. त्यामुळे मुंबई विमानतळावर विमान लँड करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मुंबई विमानतळावर उतरताच छातीत दुखत असलेल्या प्रवाशाकडूनच त्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा करण्यात आला आणि विमानतळावर एकच गोंधळ उडाला.

त्याने दिलेल्या माहितीनंतर विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांना पाचारण करण्यात आलं आणि प्रवाशाच्या बॅगेची झडती घेण्यात आली. मात्र, तपासणीनंतर प्रवाशाच्या बॅगेत काहीच आढळलं नाही. त्यामुळे या सर्व अफवा असल्याचं लक्षात आले.

हे ही वाचा:

यश शहा अपहरण- हत्या प्रकरणातील चारही आरोपी सुटले निर्दोष

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

इस्रायल हल्ल्यादरम्यान हमासचे दहशतवादी अमली पदार्थांच्या नशेत!

राजनैतिक अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईनंतर ट्रुडो पुन्हा बरळले

पोलिसांनी सदर प्रवासी आणि त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईकांची चौकशी सुरू केली. औषधांच्या प्रभावामुळे प्रवासी असं बरळत असल्याचा दावा त्याच्यासोबत असलेल्या निकटवर्तीयांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी विमानतळ पोलीस पुढील तपास करत आहेत.

Exit mobile version