एल्विश यादव प्रकरणाच्या वैदकीय अहवालात धक्कादायक माहिती समोर!

वैदकीय अहवालात धक्कादायक माहिती उघड

एल्विश यादव प्रकरणाच्या वैदकीय अहवालात धक्कादायक माहिती समोर!

युट्युबर आणि बिग बॉस ओटीटी-२ चा विजेता एल्विश यादव सध्या चर्चेत असून त्याचे नाव सर्पविष, रेव पार्टी, आणि परदेशी मुलींचा सप्लाय यात जोडले गेले.त्यानुसार पोलीस तपासही चालू आहे. आता एल्विश यादव प्रकरणाचा वैदकीय अहवाल समोर आला आहे.या वैदकीय अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

‘बिग बॉस ओटीटी-२ ‘चा विजेता एल्विश यादववर रेव पार्टी, सापाचं विष, परदेशी मुलींचा सप्लाय केल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र, एल्विश यादवने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून पोलिसांना तपासात सहकार्य करणार असल्याचं त्याने सांगितलं आहे.पोलिसही या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.या प्रकरणाच्या वैदकीय अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी रणजित तावरेंची निवड!

अमेरिकेच्या अर्थसहाय्याने अदानी समूह श्रीलंकेत उभारणार बंदर, चीनची कोंडी

हमासच्या नरसंहारातून बचावलेल्या विद्यार्थ्यांनी कथन केला प्रसंग

अलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आता श्रीकृष्णाचे व्यवस्थापन धडे

जप्त करण्यात आलेल्या सापांची वनविभागातर्फे वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.डेप्युटी सीव्हीओच्या पॅनेलतर्फे वैद्यकीय तपासणी करण्यात आली.या तपासात पाच कोब्रा जातीचे विषारी साप असल्याचे तर चार साप विषारी नसल्याचं उघड झालं आहे. आता न्यायालयाच्या परवानगीनंतर सापांना जंगलात सोडण्यात आले आहे.परंतु विषारी सापाची विक्री करणं हा कायदेशीर गुन्हा आहे. यामुळे गुन्हेगाराला सात वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते.

नोएड़ा येथे झालेल्या एका रेव्ह पार्टीसंदर्भात यादवचे नाव पुढे आले होते. त्याबाबत पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यात जयकरण, राहुल तितुनाथ, नारायण, रवीनाथ यांचा समावेश आहे.

 

 

Exit mobile version