यू-ट्युबर आणि बिग बॉस ओटीटी -२ विजेता एल्विश यादव याच्या भविष्यात अडचणी वाढण्याची शक्यता आहे.२०२३ मध्ये गायक राहुल फजुलपुरिया आणि एल्विश यादव या दोघांनी त्यांच्या गाण्यात सापांचा वापर करण्यात आला होता.गाण्यामध्ये विषारी आणि दुर्मिळ प्रजातींच्या सापाचा वापर केल्यामुळे त्याच्यावर नोएडामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.आता आणखी एक प्रकरण गुरुग्राम न्यायालयात पोहचले आहे.
गायक राहुल फजुलपुरिया आणि एल्विश यादव यांनी त्यांच्या गाण्यात १० हुन अधिक सापांचा वापर केला होता.त्यापैकी काही दुर्मिळ प्रजातीचे होते.या कृत्याचा निषेध करत पीपल फॉर ॲनिमल्स (पीएफए) संस्थेकडून नोएडामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान, एल्विश यादववर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यासाठी पीपल फॉर ॲनिमल्स (पीएफए) संस्थेचे सदस्य सौरभ गुप्ता यांना धमक्या येत असून आपली सुद्धा हत्या होऊ शकते अशी भीती त्यांना वाटत आहे.याबाबत त्यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय आणि गुरुग्राम पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे.
हे ही वाचा:
रणजी ट्रॉफी: मध्य प्रदेशला नमवत विदर्भाची फायनलमध्ये उडी!
आदम सेनेने शरियाचे उल्लंघन केल्याबद्दल मुस्लिम मुलींना धमकावले
झारखंड: सर्व आरोपी अटक, स्पॅनिश जोडपे निघाले नेपाळला!
इस्रोकडून चांद्रयान-४ ची तयारी; एकाच मोहिमेत दोन प्रक्षेपण वाहने
तक्रारदार सौरभ गुप्ता यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्रात नमूद केले आहे.त्यांनी पत्रात लिहिले की, सोशल मीडियावर मला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.त्यांनी पुढे लिहिले की, पंजाबी गायक सिद्धू मुसावाला आणि आयएनएलडी नेते नफे सिंग राठी यांच्याप्रमाणे आपल्यावरही हल्ला होऊ शकतो.या प्रकरणाची तारीख वाढवून द्यावी, जेणेकरून पोलिसांना त्यांच्या सुरक्षेची खात्री करता येईल, असे सौरभ गुप्ता यांनी लिहिले आहे.दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी( ५ मार्च) झाली.यावेळी एल्विश यादवच्या वतीने त्याचे वकील न्यायालयात हजर झाले.यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती मनोज राणा यांनी पुढील तारीख २८ मार्च निश्चित केली.
दरम्यान, ५ मार्च रोजी तपासाचा सद्यस्थितीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार होता.त्यामुळे तक्रारदार सौरभ गुप्ता याना अशी भीती वाटते की, ते जेव्हा न्यायालयात येतील तेव्हा त्यांच्यावर देखील सिद्धू मुसावाला आणि आयएनएलडी नेते नफे सिंग राठीसारखा हल्ला होऊ शकतो.