एलॉन मस्क दहा लाख लोकांना मंगळावर नेणार!

‘स्पेसएक्स’ अंतराळ संशोधन संस्थेने बनविले आतापर्यंतचे सर्वात मोठे रॉकेट

एलॉन मस्क दहा लाख लोकांना मंगळावर नेणार!

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले आणि अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क यांनी त्यांच्या नव्या गेमप्लॅनची घोषणा केली आहे. मस्क हे नेहमीच त्यांच्या विविध निर्णयामुळे आणि विविध प्रकारच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. एलॉन मस्क यांच्या मंगळ मोहिमेची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. याबाबतचं मस्क यांनी आपला नवा गेमप्लॅन सांगितला आहे.

एका एआय यूझरने मंगळ मोहिमेबद्दल विचारल्यानंतर एका एक्स पोस्टच्या रिप्लायमध्ये मस्क यांनी याबाबत माहिती दिली आहे. आपण दहा लाख लोकांना मंगळावर नेणार असल्याचं मस्क यांनी सांगितलं आहे. ही मोहीम केव्हा होईल याबाबत मात्र अद्याप त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ या अंतराळ संशोधन संस्थेने आतापर्यंतचं सर्वात मोठं रॉकेट तयार केलं आहे. स्टारशिप असं या रॉकेटचं नाव आहे. इलॉन मस्क हे या संस्थेचे फाऊंडर आणि सीईओ आहेत. या रॉकेटचा व्हिडिओ शेअर करत एका एक्स यूजरने म्हटलं, की हे रॉकेट आपल्याला मंगळावर घेऊन जाईल.

हे ही वाचा..

मोठा निर्णय! ‘सीआरपीएफ’ची परीक्षा मराठीत देता येणार

बहुमत चाचणीपूर्वी बिहारमध्ये नाट्यमय घडामोडी; आमदारांना बंदिस्त करून ठेवल्याच्या पोलिसांना तक्रारी

भारताचा पुन्हा भ्रमनिरास; १९ वर्षांखालील विश्वचषक ऑस्ट्रेलियाने हिरावला

ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीने ‘त्या’ विद्यार्थ्याला केले एका सत्रासाठी निलंबित

यावर प्रतिक्रिया देत मस्क म्हणाले आहेत की, “आम्ही एक गेमप्लॅन बनवत आहोत, ज्यामध्ये एक मिलियन (दहा लाख) लोकांना मंगळावर नेण्यात येईल. अर्थात, यासाठी आतापासूनच मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे. भविष्यात पृथ्वी जर कधी मानवाला राहण्यायोग्य राहिली नाही, तर मंगळ ग्रहाचा पर्याय आपल्याकडे असायला हवा,” असं मस्क यांनी म्हटले आहे.

Exit mobile version