एलॉन मस्क शिरले मानवाच्या मेंदूत!

चिपद्वारे शरीरावर राहणार नियंत्रण

एलॉन मस्क शिरले मानवाच्या मेंदूत!

एलॉन मस्क यांनी एक नवा इतिहास रचला आहे. जगात पहिल्यांदाच एक व्यक्तीच्या मेंदुमध्ये चीप बसवण्यात आली आहे. या चिपद्वारे शरीरावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. न्यूरोलिंक कंपनीचे संस्थापक आणि अब्जाधीश इलॉन मस्क यांनी यासंदर्भातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर माहिती दिली आहे.

एलॉन मस्क यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, “पहिल्या मानवामध्ये २९ जानेवारीला न्यूरालिंककडून इम्प्लांट करण्यात आले आणि तो रुग्ण आता बरा होत आहे. चिप इम्प्लांटचे सुरुवातीचे परिणाम आशादायक आणि सकारात्मक आहेत, असे एलॉन मस्क यांनी म्हटले.

दरम्यान, माणसांच्या मेंदूमध्ये चिप बसवल्यानंतर ते अनेक गोष्टी करू शकतील जे ते सामान्यपणे करू शकत नाहीत. अवयवांवर नियंत्रण गमावलेल्या लोकांना चिप इम्प्लांटचा फायदा होऊ शकतो असा दावा करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

ईडीच्या छापेमारीनंतर झारखंडचे मुख्यमंत्री बेपत्ता; विमानतळावर अलर्ट जारी

‘स्थगिती, लांबलचक सुनावण्यांमुळे निकालांना उशीर’

एक मुरलेला नेता दुसरा उरलेला…

सीबीआयकडून अनिल देसाई यांचे स्वीय सहाय्यक दिनेश बोभाटेविरुद्ध गुन्हा दाखल

न्यूरॉन्स हे असे सेल्स असतात जे इलेक्ट्रिकल आणि केमिकल सिग्नलचा वापर करुन मेंदू आणि शरीरात माहिती पोहोचवत असतात. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने मागील वर्षी न्यूरालिंक कंपनीला चिप मेंदूमध्ये बसवण्याचा प्रयोग करण्याची परवानगी दिली होती.

त्यानंतर एका पॅरालिसिस झालेल्या रग्णावर चाचणी घेण्याची त्यांना परवानगी मिळाली आहे आणि शरीर निकामी झालेल्या किंवा पॅरोलेसिस झालेल्या रुग्णांसाठी हे एक वरदान ठरणार आहे.

Exit mobile version