टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी टेस्ला कंपनीच्या एआय यंत्रणेचे नेतृत्व करणाऱ्या तज्ज्ञ अशोक एलुस्वामी यांची ओळख करून दिली आहे. मस्क यांनी अशोक यांचे कौतुक करून त्यांची ओळख जगाला करून दिली आहे. ‘अशोक एलुस्वामी यांच्या योगदानामुळे टेस्लाची ऑटोपायलट सिस्टीम, इनहाऊस कम्प्युटर व्हिजन आणि कस्टम एआय हार्डवेअर विकसित झाले. ज्यामुळे ऑटोनॉमस ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती झाली,’ असे कौतुक मस्क यांनी केले आहे.
भारतीय वंशाचे तंत्रज्ञ अशोक एलुस्वामी हे टेस्लाच्या ऑटोपायलट टीममध्ये नियुक्त होणारे पहिले व्यक्ती होते. सध्या ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्वीटर) नेतृत्व करतात, असे मस्क यांनी ‘एक्स’वर नमूद केले आहे. याबद्दल अशोक यांचे आभार मानून एलन यांनी अशोक यांना टेस्लाच्या एआयच्या यशासह ऑटोपायलट सॉफ्टवेअरसाठी योग्य श्रेयही दिले आहे.
हे ही वाचा:
ओडिशातील भाजपचे पहिले सरकार १०जूनऐवजी १२ जून रोजी शपथ घेणार!
‘पुन्हा भाजपचा जयजयकार केल्यास जमिनीत गाडून टाकू’
कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याची जगभरात चर्चा!
एलुस्वामी यांनीही मस्क यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. मस्क यांनी नेहमीच मोठ्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. ज्या क्षणी कोणती गोष्ट असंभव वाटायची, तेव्हा ते प्रोत्साहन द्यायचे. सन २०१४मध्ये ऑटोपायलट एका छोट्या कम्प्युटरवर सुरू झाले होते, याची आठवणही एलुस्वामी यांनी करून दिली. तसेच, अशोक यांनी त्यांच्या लेखात एआय आणि मस्क यांच्याबाबत बरेच लिहिले आहे.