अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते बनल्याबद्दल अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदींच्या ट्विटर खात्यावर १०० दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत. इलॉन मस्क यांनी ट्विटरवर पोस्ट केले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वाधिक फॉलोअर्स असलेले जागतिक नेते बनल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.’
१४ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १०० दशलक्ष फॉलोअर्ससह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (ट्विटर) सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते बनून एक नवीन मैलाचा दगड प्रस्थापित केला होता. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटकरत आनंद व्यक्त केला. ट्विट करत ते म्हणाले की, “या ज्वलंत माध्यमात राहून खूप आनंद झाला आणि चर्चा, वादविवाद, अंतर्दृष्टी, लोकांचे आशीर्वाद, रचनात्मक टीका आणि बऱ्याच गोष्टींचा आनंद घेतो. भविष्यात अशाच आकर्षक काळाची मी वाट पाहत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दरम्यान, गेल्या तीन वर्षात पंतप्रधान मोदींच्या एक्स अकाउंटवरील फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या आकडेवारीमध्ये पंतप्रधान मोदींनी सर्वांनाच मागे टाकले आहे.
हे ही वाचा..
यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा !
हवामान बदल हा कधीही स्फोट होऊ शकणारा टाईम बॉम्ब
विशाळगड हिंसाचाराशी संबंधित वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी एकाला अटक
ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंमध्ये सशस्त्र दलातील २४ जवानांचा समावेश
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन (३८.१ दशलक्ष अनुयायी), दुबईचे शासक शेख मोहम्मद (११.२ दशलक्ष अनुयायी) आणि पोप फ्रान्सिस (१८.५ दशलक्ष अनुयायी) यांसारख्या जागतिक नेत्यांना पंतप्रधान मोदींनी खूप मागे सोडले आहे. भारतीय नेत्यांच्या फॉलोअर्सच्या बाबतीतही पंतप्रधान मोदी पुढे आहेत. राहुल गांधी यांचे २६.४ दशलक्ष, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे २७.५ दशलक्ष, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचे १९.९ दशलक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे ७.४ दशलक्ष अनुयायी आहेत. आरजेडीचे लालू प्रसाद यादव यांचे ६.३ दशलक्ष आणि तेजस्वी यादव यांचे ५.२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे २.९ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
Congratulations PM @NarendraModi on being the most followed world leader!
— Elon Musk (@elonmusk) July 19, 2024