जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ज्याच्या नावाचा डंका वाजतो, त्या एलोन मस्क यांना यावेळी प्रचंड तोटा सहन करावा लागला आहे. हा तोटा पाहिला तर आश्चर्याने आपण तोंडात बोटेच घालू.
जगात खूप लोकांनी १०० बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती कमावली आहे. परंतु केवळ एकानेच एका वर्षात १०० बिलियन डॉलर्सचे नुकसान पाहिले आहे! तो म्हणजे एलोन मस्क. ट्विटर आणि टेस्ला सारख्या मोठ्या कंपन्यांचा मालक असून , तो २०२२ मध्ये सर्वाधिक तोट्यात आहे असे एका सर्व्हे द्वारा समोर आले आहे.
एलोन मस्कने पैसे कमावण्याचे विविध टप्पे पाहिले आहेत. या नुकसानामागील मुख्य कारण मागील दोन टेस्लाचे शेअर्स त्याच्या नीचांकी पातळीवर गेले होते. तरीही तो जगातला दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. नोव्हेंबर 2021 पर्यंत त्याची एकूण संपत्ती ३४० बिलियन डॉलर्स होती. टेस्लाचे शेअर्स सोमवारी न्यू यॉर्क ट्रेडिंगमध्ये ६.८ टक्क्यांनी घसरून १६७ बिलियन डॉलर्स वर आले . हा आकडा नोव्हेंबर २०२० नंतर सर्वात नीचांकी असल्याचे कळते आहे. त्याने ट्विटर कंपनी ताब्यात घेतल्यापासून ट्वीटरचे ६० टक्के पेक्षा जास्त कर्मचारी कमी झाले. या वर्षी सर्वात जास्त संपत्ती गमावणारे चांगपेंग झाओ, मार्क झुकेरबर्ग आणि जेफ बेझोस ईत्यादी असे होते.
हे ही वाचा :
उद्या मुंबईमध्ये भाजपाचा ‘माफी मांगो’ मोर्चा
ठाकरे गटाला नाशिकमध्ये खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
अखेर कोळी बांधवांची मागणी मुख्यमंत्र्यांनीचं पूर्ण केली
दरम्यान, यावर्षी अदानी यांना चांगला नफा झाला आहे. तसेच गेल्या वर्षी संपत्ती गमावणारा कॉलिन हुआंग या वर्षी या सर्व्हेत ५ व्या स्थानावर आहे. ॲमेझॉनचे मालक जेफ बेसोस आणि फेसबुकचा मालक मार्क झकरबर्ग यांनी कोविडमध्ये चांगली कमाई केली होती . पण या वर्षी त्यांची संपत्ती झपाट्याने कमी झाली. ह्याचे मूळ कारण देखील त्यांचे स्टोक्स पडणे असेच होते.