आयडीएफच्या हवाई हल्ल्यात हमास बटालियन कमांडरसह अनेक जण ठार!

आयडीएफने पोस्टकरत दिली माहिती 

आयडीएफच्या हवाई हल्ल्यात हमास बटालियन कमांडरसह अनेक जण ठार!

इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (IDF) गाझामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचा एक अव्वल दहशतवादी हातम रझाक अब्द अल-करीम शेख खली याला ठार केले आहे. आयडीएफने याबाबत पोस्टकरत ही माहिती दिली. आयडीएफच्या म्हणण्यानुसार, मारला गेलेला दहशतवादी हातम रझाक हा हमासच्या शेजैया बटालियनचा कमांडर होता. यासोबतच या हल्ल्यात इतर अनेक दहशतवादीही मारले गेले आहेत.

इस्रायली सैन्याने सांगितले की, गाझा शहरातील कमांड अँड कंट्रोल सेंटरवर केलेल्या अचूक हल्ल्यात हातम रझाक अब्द अल-करीम मारला गेला, ज्यामध्ये हमासचे इतर दहशतवादीही मारले गेले. लष्कराने सांगितले की, हल्ल्यापूर्वी नागरिकांचे नुकसान कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या, ज्यात तोफखान्यांचे हल्ले, हवाई पाळत ठेवणे आणि अतिरिक्त गुप्तचर यंत्रणांचा वापर यांचा समावेश होता. इस्रायलने स्पष्ट केले की ‘आम्ही आमच्या देशाचे रक्षण करण्यासाठी हमासविरुद्धचे हे युद्ध सुरूच ठेवू.’

हे ही वाचा : 

पु. ल. देशपांडे कला अकादमीतील नवीन संकुलाचे ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ नामकरण

भाजपाच्या प्रयोगशाळेत, काँग्रेसचा प्रयोग…

सरकारी कर्मचाऱ्यांचे ‘जमात’ आणि ‘हिजबुल’शी होते संबंध; केली हकालपट्टी!

गृहमंत्री शाह रायगड दौऱ्यावर, सुनील तटकरेंच्या निवासस्थानी करणार भोजन!

या दहशतवाद्याला ठार मारण्यासोबतच, इस्रायली सैन्याने हल्ल्यात हमासचे कमांड अँड कंट्रोल सेंटर देखील उडवून दिले आहे. आयडीएफने सांगितले की, हवाई दलाने सिटी परिसरातील हमासचे कमांड अँड कंट्रोल कंपाऊंड उडवून टाकले. हमास दहशतवादी संघटनेचे अनेक दहशतवादी या कंपाऊंडमध्ये इस्रायली नागरिक आणि आयडीएफ सैन्याविरुद्ध दहशतवादी कट रचण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी काम करत होते.

इस्रायली लष्कराने म्हटले की हमास आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करतो. दहशतवादी कारवायांसाठी नागरिकांचा आणि त्यांच्या इमारतींचा मानवी ढाल म्हणून क्रूरपणे वापर करतो. या दहशतवाद्यांवर आयडीएफ कारवाई करत राहील.

 

भाजपाच्या प्रयोगशाळेत, काँग्रेसचा प्रयोग...  | Dinesh Kanji | Rahul Gandhi | Congress | Priyanka

Exit mobile version