मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम मागील गेल्या १२ वर्षापासून चालू आहे. अद्याप ही, हे काम अर्धवट आहे. तसेच महामार्गाच्या दुरावस्थेमुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहन अपघात होण्याचे सत्र चालूच आहे. शिवाय महामार्ग वापरण्यास योग्य नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. तसेच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज, रविवारी १६ ऑक्टोबर रोजी पेण येथे मुंबई-गोवा महामार्ग बंद जनआंदोलन करण्यात आले. तसेच हे आंदोलन हे ‘माझं पेण’ या संस्थेच्या मुंबई-गोवा महामार्ग विकास समितीतर्फे हे जनआंदोलन करण्यात आले होते.
पेण तालुक्यातील ‘माझं पेण’ या सामाजिक संघटनेने पुढाकार घेऊन या निकृष्ट दर्जाच्या आणि कासव गतीने सुरू असणाऱ्या महामार्गाच्या कामाकडे प्रशासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी रविवारी १६ ऑक्टोबर रोजी मुंबई-गोवा महामार्गा बंद करण्याचा पवित्रा घेतला होता. तसेच या बाबत प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांसह जिल्हाधिकारी, बांधकाम मंत्री व मुख्यमंत्री यांना संघटनेच्या माध्यमातून लेखी निवेदन देण्यात आले आहेत.
या महामार्गावरून प्रवासी विद्यार्थी, महीला, जेष्ठ नागरिक, रुग्ण, गरोदर स्त्रिया या सर्वच प्रकारचा प्रवाशांना प्रवास करतात तसेच अनेक खड्डे यामुळे पाठदुखी, व मानदुखी विकार जडले आहेत. धुळीच्या साम्राज्यच्या मुळे इथे श्वसनाचे विकार जडलेले आहेत. तसेच पत्रकार संघटनांसाह अनेक सामाजिक संघटनांनी विविध प्रकारची आंदोलन करून विषय लावून धरला होता, तरी देखील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी देखील काहीच हालचाल करत नसल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा
बोरिवली ते ठाणे प्रवास आता तासात नाही मिनिटांत
रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’
नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले
‘एकता कपूर बिघडवत आहे तरुणाईला!’
तसेच मागील वर्षात मुंबई-गोवा महामार्ग संदर्भात हा महामार्ग मानवी वापरासाठी योग्य नसल्याचा अहवाल देखील ‘कोर्ट कमिशनर’ ने दिल आहे. राजकीय नेते व प्रशासनाने देखील याकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच या महामार्गावर १२ वर्षांत सुमारे ५७५ अपघात झाले असून, अंदाजे २६२ जणांचा यात मृत्यू झाला आहे. तर ६२७ जण जखमी झाले आहेत. त्याचप्रमाणे ३५९ कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.