21 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरविशेषहेल्पलाईन आपची आणि ताप जबलपूरच्या तरुणाला

हेल्पलाईन आपची आणि ताप जबलपूरच्या तरुणाला

Google News Follow

Related

दिल्लीतील सर्वसामान्यांच्या सोयीसाठी जारी करण्यात आलेला क्रमांक जबलपूरच्या तरुणासाठी अडचणीचा ठरला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वीज सबसिडीबाबत एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला होता. मात्र जारी करण्यात आलेल्या क्रमांकामध्ये केवळ दोन अंकांचा फरक असल्याने  सर्व कॉल जबलपूरला येत असून सर्व मिस्ड कॉल शहरातील तरुण पायलटच्या वैयक्तिक क्रमांकावर येत आहेत.

दिल्ली सरकारने वीज सबसिडीबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर  केली आहेत. त्यानुसार   १ ऑक्टोबरपासून सबसिडी घ्यायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला एकतर फिजिकल फॉर्म भरावा लागेल किंवा तुम्हाला सरकारने जारी केलेला नंबर टाकावा लागेल किंवा तुम्हाला त्यावर मिस कॉल करावा लागेल. ज्यांना अनुदान चालू ठेवायचे आहे किंवा वीज सबसिडी सोडायची आहे अशा दिल्लीतील सर्व कुटुंबांसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा हा संदेश आहे.

हे ही वाचा:

बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी

अमेरिका का म्हणतोय UNSC मध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व द्या?

… आणि पंतप्रधान मोदींनी परभणीच्या चिमुरडीला पाठवलं पत्र

‘ज्यांना दूध पाजले म्हणता त्या शिवसैनिकांचा त्याग, मेहनत आहे पक्षवाढीत’

ही  योजना जबलपूर तरुणांसाठी मात्र तापदायक ठरली आहे.   त्याची  दिवसभराची झोप आणि शांतता भंग पावली आहे.  त्याच्या फोनवर रात्रंदिवस कॉल्स आणि मिस्ड कॉल येत आहेत. याचे मूळ कारण म्हणजे हेल्पलाइन क्रमांक एकसारखा आहे. खरेतर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वीज सबसिडीसाठी जारी केलेला हेल्पलाइन क्रमांक ७०११३१११११ आहे तर जबलपूर येथील रहिवासी मोहम्मद फहीम खान यांचा ७०३११११११ क्रमांक आहे.

या  हेल्पलाईन नंबरमध्ये थोडासाच अंकांचा फरक आहे . लोक या नंबरवर नेमके फोन करत आहेत. यात ना दिल्ली सरकारचा दोष आहे ना मोहम्मद फहीमचा. मात्र एक नंबर बदलल्याने  शेकडो लोक वीज सबसिडी हेल्पलाइन नंबरच्या नावाने फहीमला रात्रंदिवस फोन करत आहेत.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा