कल्याणमध्ये सिग्नलचीच बत्ती गुल!!

कल्याणमध्ये सिग्नलचीच बत्ती गुल!!

महावितरणाच्या अजब कारभाराचा अजून एक नमुना आज समोर आला आहे. महावितरणाने चक्क सिग्नल यंत्रणेचाच विजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात वाहतूक सिग्नल यंत्रणेचा वीजपुरवठा महावितरणाने खंडित केल्याची घटना समोर आली आहे. वाहतूक व्यवस्थापनाकडून वीजबिल न भरल्यानं महावितराणानं हे पाऊल उचलले असल्याचे समजले आहे. व्यवस्थापनाकडून मागील १३६ दिवसांचं वीजबिल भरलं नाहीये. त्यामुळे महावितरणानं ही कारवाई केली. सिग्नल यंत्रणेचा वीजपुरवठा खंडित केल्यानं वाहतूकीचा फज्जा उडताना दिसत आहे.

विशेष म्हणजे सिग्नल यंत्रणेचा वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती व्यवस्थापनाला नसल्याचे समोर आले आहे. सिग्नल अभावी शहरात वाहतुकीचा खोळंबा होत आहे. कल्याण पश्चिमेतील लालचौकी परिसरातील सिग्नल यंत्रणेचा वीज पुरवठा खंडित केल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे. या सिग्नल यंत्रणेचं व्यवस्थापन ‘स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन’कडे आहे.

हे ही वाचा:

लोकल प्रवास नाकारणारे जनविरोधी ठाकरे सरकार

न्यायालयाने विचारणा केल्यावर तरी राज्य सरकारला जाग येणार का?

भाजपाच्या रेलभरो आंदोलनाचा मुंबईत एल्गार

सर्वोच्च न्यायालयाचा अंबानींना दणका, काय आहे प्रकरण?

गेल्या वर्षी स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण-डोंबिवली परिसरात विविध महत्त्वाच्या चौकांमध्ये अद्ययावत सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून कल्याणमधील गजबजलेल्या लालचौकी परिसरातही ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र मागील बऱ्याच दिवसांपासून स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनकडून या सिग्नल यंत्रणेचे वीजबिल भरण्यात आलेले नाही. त्यामुळे महावितरणानं वीजपुरवठा खंडित करून स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनला दणका दिला आहे.

ठाण्यातील लालचौकी परिसरातील सिग्नल यंत्रणेचं मागील १३६ दिवसांचं ११ हजारांचं बिल थकीत आहे. हे बिल न भरल्यानं सिग्नल यंत्रणेचा वीज पुरवठा खंडित केल्याची माहिती महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version