कुमार राज्य खो-खो स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अश्विनी, रुपेश यांना इलेक्ट्रिक बाईक

मुंबई खिलाडीजचे संघ मालक पुनीत बालन यांनी दिले बक्षीस

कुमार राज्य खो-खो स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अश्विनी, रुपेश यांना इलेक्ट्रिक बाईक

पुणे, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २०२२-२३ घेण्यात आली होती. या स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू अश्विनी शिंदे (धाराशिव) (मुली गट) व रूपेश कोंडाळकर (ठाणे)( कुमार गट) या खेळाडूंना पुनीत बालन ग्रुप तर्फे इलेक्ट्रिक बाईक देण्यात आली.

स्पर्धा कालावधीत पुनीत बालन यांनी बाईक देण्याची घोषणा केली होती. नुकताच पुनीत बालन कार्यालय पुणे येथे ही इलेक्ट्रिक बाईक देण्यात आली. या एका बाईकची किंमत १ लाख २९ हजार असून अश्या दोन बाईक देण्यात आल्या. पुनीत बालन संघमालक मुंबई खिलाडीज व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे यांचे सर्वांनी विशेष आभार व्यक्त केले.

हे ही वाचा:

बंगळूरू कॅफे ब्लास्टमागील आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी

“निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असला तरी नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर पूर्ण झाले नसते”

मांस-मटन खाण्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांकडून ‘इंडी’ आघाडीच्या नेत्यांची पाठराखण

बंगळूरू कॅफे ब्लास्टच्या मास्टरमाइंडचे वडील होते सैन्यदलात; मुलाच्या कृत्याने दुःखी

या प्रसंगी भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव तसेच महाराष्ट्र खो-खो असोसिएशन सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन खजिनदार गोविंद शर्मा, धाराशिव जिल्हा खो-खो असोसिएशन सचिव प्रविण बागल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशन सचिव विकास सूर्यवंशी तसेच खेळाडूंचे पालक उपस्थित होते.

Exit mobile version