६ रुपयाचे तिकीट फाडा.. इलेक्ट्रिक डबलडेकर एसी बसने फिरा

आजपासून सीएसएमटी-एनसीपीए दरम्यान धावणार

६ रुपयाचे तिकीट फाडा.. इलेक्ट्रिक डबलडेकर एसी बसने फिरा

देशातील पहिली इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस मंगळवारपासून मुंबईकरांच्या सेवेला येत आहे. ही बस दक्षिण मुंबईत सीएसएमटी आणि एनसीपीएदरम्यान धावणार आहे. पहिल्या पाच किलोमीटरसाठी सहा रुपये भाडे असेल. उन्हाळ्याचे चटके जाणवू लागल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पहिली डबल-डेकर इलेक्ट्रिक एसी बस मंगळवारी सकाळी ८.४५ वाजता सीएसएमटी ते एनसीपीए दरम्यान धावेल. ११५ असा या बसचा क्रमांक असेल. होईल. मार्ग क्रमांक १११, फ्री प्रेस जर्नल मार्ग ते सीएसएमटी या मार्गावरील सेवा रात्री १०.३० वाजेपर्यंत वाढवण्यात येतील.

कार्यालयात जाणाऱ्यांच्या फायद्यासाठी बेस्टने ११५ क्रमांकाची बस सेवा आठवड्याच्या शेवटच्या दिवशी रात्री १०.३० पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत आणखी पाच डबलडेकर बस ताफ्यात सामील केल्या जाणार असल्याचे बेस्ट उपक्रमाने म्हटले आहे.

हे ही वाचा:

शिवसेनेचे विधीमंडळातील कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात..शिवालयही येणार

आक्षेपार्ह विधानाविरोधात संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा

रुग्ण म्हणून दाखल झाला आणि रुग्णालयातून चोरले महागडे नळ…

बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीत जो येईल तो नवी ऊर्जा, प्रेरणा घेऊन जाईल!

तीन तासांच्या एका चार्जमध्ये ही बस १२० किमी अंतर कापू शकते. एका वेळी ६५ लोक बसून तर १५ ते २० लोक उभे राहून प्रवास करु शकतात.या बसमध्ये सीट बेल्ट, स्पीकर या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. प्रवाशांची गरज आणि सुरक्षितता लक्षात घेऊन बसमध्ये विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. बेस्टच्या ताफ्यात २००इलेक्ट्रिक डबल डेकर बस येणार आहेत.

या बसेस राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत समाविष्ट केल्या आहेत आणि मुंबईकरांना जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव देतील,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ फेब्रुवारी रोजी उद्घाटन करताना सांगितले होते.

Exit mobile version