लोकसभा २०२४ ची निवडणूक भर उन्हाळ्यात पार पडली.देशातील मतदारांनी देखील यावर भाष्य करून नाराजी व्यक्त केली होती.दरम्यान, उन्हात निवडणूका घेणे हे चुकीचे असल्याचे खुद्द भारतीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे.याबाबत निवडणूक आयोगाने आपली चूक मान्य केली आहे. यापुढे महिनाभर आधी लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर उद्या(४ जून) निकाल लागणार आहे.तत्पूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी आज पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्यांनी सार्वत्रिक निवडणुकीशी संबंधित प्रश्नांना मनमोकळे पणाने उत्तरे दिली.या निवडणुकीत अनेक विक्रम झाले.परंतु या निवडणुकीत आमच्याकडून काही चुका झाल्याचेही आयुक्तांनी सांगितले.यंदाची निवडणूक रखरखत्या उन्हात घेण्यात आली.मात्र, यापुढे महिनाभर आधी लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
राममंदिराच्या पुजाऱ्याने पंतप्रधान मोदींबाबत सांगितले मोठे भविष्य!
अरुण गवळी उर्फ डॅडीची तुरुंगातून सुटका नाहीच!
कन्याकुमारीमधील ध्यानधारणेचा अनुभव सांगत नरेंद्र मोदींनी सांगितला विकसित भारताचा रोड मॅप
विवान कारुळकरच्या सनातन धर्मावरील पुस्तकावर ब्रिटन राजघराण्याची मोहोर
ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत जगात प्रथमच ६४ कोटी २ लाख लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. जगभरातील कोणत्याही देशात इतक्या विक्रमी संख्येने मतदान झाले नाही. देशातील ३१ कोटी २० लाख मतदारांनी मतदान केले. देशातील ज्येष्ठ लोकांनी मोठ्या संख्येने मतदान केले आहे.
तसेच निवडणूक आयुक्तांना ‘मिसिंग जेंटलमेन’ असे नाव देऊन सोशल मीडियावर मिम्स व्हायरल झाले होते.यावर उत्तर देताना निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, ‘आम्ही नेहमीच येथे होतो, कधीही मिसिंग न्हवतो’.आता मेम मेकर्स म्हणू शकतात की, ‘मिसिंग जेंटलमेन’ परत आला आहे.