लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्प्याचे मतदान नुकतेच पार पडले.उर्वरित टप्प्यासाठी राजकीय पक्ष जोर लावत आहेत तोपर्यंत महाराष्ट्र विधानपरिषदेच्या चार जागांच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार जागांसाठी हे मतदान होणार आहे.मुंबई पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ, कोकण पदवीधर मतदारसंघ तसेच नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी या निवडणुका होणार आहेत.या चार जागांसाठी १० जूनला मतदान होणार असून १३ जून रोजी मतमोजणी होणार, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
विधान परिषद सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी ७ सदस्य शिक्षक, तर ७ सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडून जातात. दरम्यान दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघातील चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपणार आहे.या रिक्त होणाऱ्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.या जागांसाठी १० जूनला मतदान होणार असून १३ जूनला मतमोजणी होणार आहे.
हे ही वाचा:
पवारांनी ठाकरेंची भविष्यवाणी केली, फडणवीसांच्या मतावर शिक्कामोर्तबसुद्धा
संभाजीनगर, धाराशिव विरोधातील लोक महाविकास आघाडीचे!
मुंबई पोलिसांच्या हाती पैशाचं घबाड, नाकाबंदी दरम्यान व्हॅनमधून सापडले ४ कोटी ७० लाख रुपये!
पाकिस्तानला कशाला हवी अमेठीची चिंता?
७ जुलै रोजी या चार आमदारांचा संपणार कालावधी
विलास विनायक पोतनीस – मुंबई पदवीधर (ठाकरे गट)
निरंजन वसंत डावखरे – कोकण पदवीधर (भाजप)
किशोर भिकाजी दराडे – नाशिक शिक्षक (ठाकरे गट)
कपिल हरिश्चंद्र पाटील – मुंबई शिक्षक (लोकभारती
दरम्यान, निवडणुकीची प्रक्रिया १५ मे पासून सुरू होणर आहे. इच्छुक उमेदवारांनी २२ मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. इच्छुकांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी २४ मे रोजी होणार आहे.जर उमेदवाराला आपला अर्ज मागे घ्यायचा असेल तर २७ मे पर्यंत मागे घेऊ शकतो.