विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघांच्या निवडणूका पुढे ढकलल्या

विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघांच्या निवडणूका पुढे ढकलल्या

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून अशातच निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आल्या होत्या. या निवडणुकीसाठी पुढच्या महिन्यात १० जूनला मतदान होणार होतं. दरम्यान, या निवडणुका पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी होत होती. शिक्षक संघटनांकडून करण्यात येत असलेली ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. त्यानुसार विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत.

निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचे मतदान १० जून रोजी होणार असल्याचे जाहीर केली होते. १० जूनला अनेक शाळा आणि शिक्षकांना सुट्टी आहे. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम पडू शकतो, असा शिक्षक संघटनांचा दावा होता आणि ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी होती. निवडणूक आयोगाने शिक्षक संघटनांची ही मागणी मान्य केली आहे. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ या दोन जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. तसेच नाशिक आणि मुंबईच्या शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. या चारही जागांवरील विद्यमान आमदारांचा कार्यकाळ हा येत्या ७ जुलैला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली होती.

हे ही वाचा:

इराण- भारतमधील चाबहार बंदराचा करार अमेरिकेला खुपला; निर्बंधांची दिली धमकी

पुरात सापडलेल्या केनियाला भारताने पुन्हा दिला मदतीचा हात!

नांदेडच्या छापेमारीत ८ किलो सोनं, १४ कोटींची रोकड अशी १७० कोटींची मालमत्ता जप्त!

घाटकोपर होर्डिंग प्रकरणात लोहमार्ग पोलीस ही तेवढेच जबाबदार

मुंबई पदवीधर मतदारसंघावर विलास पोतनीस हे विद्यमान आमदार असून कोकण विभाग पदवीधर मतदारसंघावर निरंजन डावखरे विद्यमान आमदार आहेत. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघावर किशोरे दराडे हे विद्यमान आमदार आहेत. तर मुंबई शिक्षक मतदारसंघात कपिल पाटील हे विद्यमान आमदार आहेत. या सर्व आमदारांचा विधान परिषदेचा कार्यकाळ हा येत्या ७ जुलै रोजी संपणार आहे.

Exit mobile version