युवराज सिंग नव्हे; जया प्रदा, अक्षय कुमार, सेहवाग यांच्या उमेदवारीसाठी भाजप प्रयत्नशील!

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात भाजपकडून भोजपुरी स्टार पवन सिंह मैदानात

युवराज सिंग नव्हे; जया प्रदा, अक्षय कुमार, सेहवाग यांच्या उमेदवारीसाठी भाजप प्रयत्नशील!

लोकसभा निवडणुकीत नामांकित व्यक्तींना मैदानात उतरवण्याची भाजपची तयारी आहे. याआधी भाजपकडून माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला गुरुदासपूर येथून लोकसभेचे तिकीट दिले जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र शुक्रवारी त्याने आपण निवडणूक लढवत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता भाजपकडून माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, अक्षय कुमार, जया प्रदा आणि पवन सिंह यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

अक्षय कुमार, पवन सिंह, जयाप्रदा यांनी निवडणुका लढवण्याची तयारी दर्शवल्याचा दावा पक्षाच्या सूत्रांनी दिला आहे. तर, सेहवागसहित अन्य व्यक्तींशी चर्चा सुरू आहे. अक्षय कुमार याला किरण खेर यांच्या चंडिगढ मतदारसंघातून उतरवले जाऊ शकते. सेहवाग तयार झाल्यास त्यांना दिल्ली किंवा हरयाणातील एखादी जागा दिली जाऊ शकते. तर, जयाप्रदा यांना दक्षिणेकडील एखाद्या राज्यातून तिकीट दिले जाऊ शकते.

हे ही वाचा:

‘या चित्रपटामुळे कोणी नाराज झाल्याचे मला तरी दिसलेले नाही’

नितीन गडकरी यांची मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश यंना कायदेशीर नोटीस!

भारताला भेट देण्यासाठी आलेल्या स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार!

गौतम गंभीरचा राजकारणाला राम राम!

भाजपने पश्चिम बंगालच्या आसनपोल जागेवरून तृणमूलचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात भोजपुरी स्टार पवन सिंह यांना उतरवण्याची तयारी केल्याचे समजते. तसेच, पूर्वांचल व भोजपुरी क्षेत्रात पकड मजबूत राखण्यासाठी भोजपुरी चित्रपटांशी संबंधित रविकिशन, मनोज तिवारी, दिनेशलाल यादव निरहुआ यांची मदत घेतली जाऊ शकते.
युवराज सिंग याने शुक्रवारी रात्री उशिरा आपण गुरुदासपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत नसल्याचे जाहीर केले. मी माझ्या यूव्हीकॅन फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध लोकांना मदत करण्याचे काम सुरू ठेवणार आहे, असे स्पष्टीकरण त्याने दिले आहे.

Exit mobile version