भारतीय निवडणूक आयोगाने तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांचे निलंबन मागे घेतले आहे.तेलंगणा विधानसभेच्या मतमोजणीच्या दिवशी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक मंडळाने अंजनी कुमार यांना निलंबित केले होते.त्यांनतर आता निवडणूक आयोगाने कुमार यांचे निलंबन मागे घेतले आहे.
३ डिसेंबर रोजी तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी तेलंगणाचे तत्कालीन पोलीस प्रमुख अंजनी कुमार यांच्यासह राज्याचे पोलीस नोडल अधिकारी संजय जैन आणि नोडल (खर्च) अधिकारी महेश भागवत यांनी काँग्रेस नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या हैद्राबादयेथील निवासस्थानी पोलीस प्रमुख अंजनी कुमार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांची भेट घेतली होती.
हे ही वाचा :
हमासची उत्तर गाझामध्ये शरणागती… इस्रायलचा दावा
मध्य प्रदेशात भाजपाचे धक्कातंत्र; शिवराजसिंह चौहानांऐवजी मोहन यादवांची मुख्यमंत्रीपदी वर्णी
सर्वोच्च न्यायालयाच्या ३७० संबंधीच्या निर्णयाचा बॉलीवूडला आनंद
शेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या नरभक्षक वाघाला पकडा अन्यथा ठार करा!
पोलीस प्रमुख अंजनी कुमार यांचे हे वर्तन आचारसंहितेचे उल्लंघन मानून त्यांना निलंबित करण्यात आले होते.अंजनी कुमार यांच्या यांच्या निलंबनानंतर वरिष्ठ आयपीएस अधिकारी रवी गुप्ता यांच्याकडे तेलंगणाच्या डीजीपीचा संपूर्ण अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला.
दरम्यान, निवडणूक आयोगाने पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांचे निलंबन मागे घेतले असले तरी त्यांना आता कुठे तैनात केले जाईल याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.