अनोखा उपक्रम! निवडणूक आयोगाकडून ६० फूट खोल पाण्यातून मतदानासाठी आवाहन

चेन्नईमध्ये राबविण्यात आला उपक्रम

अनोखा उपक्रम! निवडणूक आयोगाकडून ६० फूट खोल पाण्यातून मतदानासाठी आवाहन

देशातील लोकसभा निवडणुका अगदीच तोंडावर आलेल्या असताना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. निवडणुकीदरम्यान सर्व वयोगटातील मतदारांकडून मतदान केले जावे यासाठी जनजागृती उपक्रम देशभरात सुरू आहेत. आतापर्यंत शाळा, कम्युनिटी सेंटर, रहिवासी संकुल आदी ठिकाणी मतदानाबाबत जनजागृती मोहीम राबविली जात होती. मात्र, आता निवडणूक आयोगाकडून ६० फूट खोल पाण्यातून लोकांना मतदानासाठी आवाहन करण्यात येत आहे. चेन्नईत हा उपक्रम राबविण्यात आला.

चेन्नईतील नीलंकराय येथे समुद्राच्या खोल तळाशी जाऊन स्कुबा डायव्हर्सनी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया नागरिकांना समजावून सांगितली. निवडणूक आयोगाने याचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. व्हिडिओ जारी करताना आयोगाने लिहिले की, “मतदार जागृतीच्या अनोख्या उपक्रमात, चेन्नईतील स्कुबा डायव्हर्सनी ६० फूट पाण्याखाली मतदान प्रक्रिया पार पाडत नीलंकराय येथील समुद्रात उडी मारली.” यामुळे तरुण मतदारांमध्ये जागृती होत असून त्यांनी मतदानात सहभागी व्हावं हा यामागील उद्देश आहे.

हे ही वाचा..

कुराण जाळणारा इराकचा सलवान मोमिक जिवंत!

पाकिस्तानमध्ये गुन्हेगारीच्या प्रकरणामध्ये लक्षणीय वाढ !

गाय मारल्याप्रकरणी मीरा रोडमधून नईम कुरेशीला अटक

विमाने खरेदी करण्यासाठी ६५ हजार कोटींची निविदा

देशात १९ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीला सुरुवात होत आहे. ४ जून २०२४ रोजी या महत्त्वाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. देशात लोकसभा निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार आहेत. दरम्यान, १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी संपणार आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकीसोबतच सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत.

Exit mobile version