शिवसेना गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. शिंदेनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या प्रमाणे १४ विधानसभा आता विसर्जित झाली आहे. त्यामुळे आता पुढचा मुख्यमंत्री कोण याच्याही हालचालीला सुरुवात झाली आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची नेमणूक करण्यात आली आहे. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे राज्याच्या कारभाराची जबाबदारी पार पाडतील. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. राजीनाम्याची औपचारिकता राजभवनावर आता पार पडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत २० आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भाजपचे १० तर शिंदेंचे ६ आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर अजित पवार गटाचे ४ आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
हे ही वाचा :
चंदीगडमधील दोन क्लबबाहेर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी फेकली स्फोटके
पुन्हा एकदा रश्मी शुक्ला यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार
विधानसभा निवडणुकीत ८५% उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; १० वर्षांतील सर्वाधिक ३.५ कोटी रुपये जप्त
बांगलादेशात चिन्मय प्रभू यांच्या अटकेविरोधात निदर्शन करणाऱ्या हिंदू समुदायावर अज्ञातांकडून हल्ला