एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांच्या तोंडी दिले जाणार होते!

आमदार संजय गायकवाड यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांच्या तोंडी दिले जाणार होते!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चकमक घडवून जीवे मारलं जाणार होतं, असं खळबळजनक विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे. तसेच मी जबाबदारपणे हा गौप्यस्फोट करत आहे, असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे. संजय गायकवाड यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हत्येच्या कटाबाबत आमदार संजय गायकवाड म्हणाले, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.राऊत म्हणाले होते की, उद्धव ठाकरे शिंदेंना पद देत होते,मात्र शिंदेनी त्यांचे हातच घेतले.यावर संजय गायकवाड म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना दुसरं काहीही दिलं जाणार नव्हतं, त्यांना मृत्यू दिला जाणार होता. नक्षलवाद्यांच्या हातून त्यांचं एन्काऊंटर केलं जाणार होतं. मुख्यमंत्र्यांना नक्षलींच्या ताब्यात देऊन हत्या घडवून आणण्याचं त्यांचं स्वप्न धुळीस मिळालं आहे. मी अत्यंत जबाबदारीने हा गौप्यस्फोट करत आहे.”

हे ही वाचा:

इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेला आठवला मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला

भारतातील जनता इस्रायलच्या बाजूने

मनी लाँड्रिंग प्रकरणी व्हिवोच्या अधिकाऱ्यांना अटक

दादा भुसेंचा सुषमा अंधारेंना इशारा!

एकनाथ शिंदेंच्या कथित एन्काऊंटरमागे नेमकी पार्श्वभूमी काय आहे? असा प्रश्न विचारला असता संजय गायकवाड पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती. या धमकीनंतर राज्य सरकारने एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. ही सुरक्षा देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री शंभुराज देसाई यांच्या घरी बैठक सुरू होती. त्यावेळी ‘मातोश्री’वरून (उद्धव ठाकरेंचं निवासस्थान) फोन आला आणि एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, असं सांगण्यात आलं. याचा अर्थ काय? तुम्ही त्यांना मारण्यासाठी टपले होते. त्यांना नक्षलींच्या हातून मारायचं होतं. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंना सुरक्षा नाकारली, ते म्हणाले.

यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे यांना z+ सुरक्षा द्यावं अस ठऱलं होतं. एकनाथ शिंदे यांना दुसरी धमकी आली तेव्हा मंत्रलयात बैठक झाली होती. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचाही उल्लेख होता. यावेळी बैठकीत असं ठरलं होतं की, एकनाथ शिंदे यांना z+ सुरक्षा द्यावी, आणि एकनाथ शिंदेच्या कुटुंबियांना z सुरक्षा द्यायला हवी. असं ठरलं नंतर फाईल अंतिम मान्यतेसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आली पण त्यांनी सीएम कार्यालयाकडून सुरक्षेबाबत निर्णय घेतला नाही. अधिवेशन संपलं त्यामुळे कोणताही निर्णय यासंदर्भात झाला नसल्याची वस्तुस्थिती असल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले.

 

Exit mobile version