‘छत्रपती शिवरायांसारखीच एकनाथ शिंदेंनी सुटका करून घेतली’

मंगलप्रभात लोढा यांनी शिवप्रतापदिनी केले होते वक्तव्य

‘छत्रपती शिवरायांसारखीच एकनाथ शिंदेंनी सुटका करून घेतली’

मंगलप्रभात लोढा यांनी किल्ले प्रतापगडावर शिवप्रतापदिनाच्या निमित्त केलेल्या भाषणात एका वक्त्यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाच्या नावाने तुणतुणे वाजवायला सुरुवात केली आहे.

प्रतापगडावर आज शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, तसेच साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार महेश शिंदे, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. त्यांच्यानंतर पर्यटनमंत्री मंगप्रभात लोढा यांनी भाषण करत उपस्थितांना संबोधित केलं.

भाषणात काय म्हणाले मंगप्रभात लोढा

मंगलप्रभात लोढा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांना औरंगजेबाने पकडून आग्र्याच्या किल्ल्यात जेव्हा बंदीस्त केलं होतं. त्यावेळी शिवाजी महाराज यांनी स्वत:साठी नाही तर हिंदवी स्वराज्यासाठी युक्तीने सुटका करून घेतली. त्यामुळेच भारतात हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. असाच प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचा झाला. पण एकनाथ शिंदे यांनी सुद्धा तशीच सुटका करून घेतली आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचं सरकार स्थापन झालं, असं मंगलप्रभात लोढा यांनी भाषणात म्हटले.

हेही वाचा :

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शिस्त मोडताय? मग तुम्हाला कुणीतरी पाहतंय

१ डिसेंबर पासून ई रूपीचे डिजिटल नाणे खुळखुळणार

पालघर-डहाणूमध्ये ड्रोन्सचा विनापरवाना वापर वाढला

नवले पुलावर अपघात सत्र सुरूचं, सात जखमी

मंगलप्रभात लोढा यांनी या वाक्यात कुठेही शिवाजी महाराजांची तुलना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर केल्याचे दिसत नाही, असे प्रत्युत्तर भाजपाकडून देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांचा जो प्रसंग घडला याची तुलना केली आणि तो प्रसंग कसा मिळताजुळता आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता, असा बचावही करण्यात आला आहे.

मंगलप्रभात यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून टीका होतेय. आदित्य ठाकरे, अजित पवार, अमोल कोल्हे, अमोल मिटकरी यांनी मंगलप्रभात लोढा यांच्या विधानाचा तीव्र निषेध केलाय. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीची तुलना शिवरायांच्या प्रतापाशी होऊ शकत नाही, असा या नेत्यांचा एकसूर पाहायला मिळतोय.

या विधानांतर, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली नाही. तर जो प्रसंग घडला याची तुलना केली. केवळ त्या प्रसंगातील साधर्म्य दाखवण्याचा माझा प्रयत्न होता, असं मंगलप्रभात लोढा म्हणालेत.

Exit mobile version