ठाणे महानरपालिकेच्या कळवा येथील छ्त्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काही दिवसांपूर्वी १८ रुग्णांचा २४ तासांत मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब घडली होती. त्यानंतर शासकीय रुग्णालयांची परिस्थिती हा मुद्दा चर्चेत आला होता. तसेच मुंबईतील केईएम रुग्णालय हे अनेकदा चर्चेत असतं. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार, २१ ऑगस्ट रोजी केईएम रुग्णालयाला अचानक भेट दिली. एकनाथ शिंदे यांच्या सरप्राईज भेटीमुळे रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या परिसरात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी अचानक आपला ताफा केईएम रुग्णालयाकडे वळविण्याच्या सूचना दिल्या. एकनाथ शिंदे अचानक काहीही पूर्वसूचना न देता रुग्णालयात पोहचल्याने अनेकांची धांदल उडाली होती. यावेळी त्यांनी रुग्णालयामधील सोयीसुविधा, उपकरणे यांची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी हॉस्पिटलच्या आयसीयू विभागाची देखील पाहणी केली. केईएम रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून बंद अवस्थेत असलेले सहा वॉर्ड देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी पाहिले आणि हे विभाग तात्काळ सुरू करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
#मुंबई तील परळ विभागातील केईएम रुग्णालयाला आज अचानक भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला.
रुग्णालयातील सामान्य विभागासह अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी देखील संवाद साधून त्यांना मिळत असलेल्या उपचारांची माहिती घेतली. तसेच त्यांना कोणत्याही बाबतीत गैरसोय होते अथवा… pic.twitter.com/IQHj1irxDr
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 21, 2023
हे ही वाचा:
अभिनेते प्रकाश राज यांनी चांद्रयानावरून उडवली खिल्ली
५०० घरांची सोडत; गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळणार
ऋतुराज बरसला, संजू, रिंकूही ठरले दमदार
भारत दौऱ्यावर आलेल्या जर्मन मंत्र्यांनी चक्क ‘यूपीआय’द्वारे केली भाजीखरेदी
काही दिवसांपूर्वी ठाण्यातील पालिकेच्या कळवा रुग्णालयामध्ये २४ तासांमध्ये १८ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यावरुन राज्यात खळबळ उडाली होती. विरोधकांनीही हे प्रकरण लावून धरले होते. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी १० दिवसात अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी केईएम रुग्णालयाला भेट दिल्याच्या चर्चा आहेत.