राजकोट किल्यावरील घटना दुर्दैवी; शिवरायांच्या चरणी डोके ठेऊन शंभर वेळा माफी मागतो

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागितली माफी

राजकोट किल्यावरील घटना दुर्दैवी; शिवरायांच्या चरणी डोके ठेऊन शंभर वेळा माफी मागतो

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळला. यानंतर या मुद्द्यावरून राजकारण पेटलं असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागितली आहे. तसेच या मुद्द्यावरून राजकारण न करण्याचे आवाहन त्यांनी विरोधकांना केले असून लवकरात लवकर त्याठिकाणी भव्य पुतळा उभारला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “पुतळ्यासंबंधी झालेली घटना दुर्दैवी असून मनाला अतिशय दुःख देणारी आहे. घडलेली घटना दुर्दैवी पण त्यावर होत असलेलं राजकारण आणखी दुर्दैवी आहे. राजकारण करण्यास अनेक विषय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे आपली अस्मिता आहेत. ते आपले दैवत आहेत. त्यावर कृपया करुन राजकारण करु नका. मी त्यांच्या चरणावर डोके ठेवून एकदा नाही तर शंभर वेळा माफी मागतो. त्यांचा आदर्श ठेऊनच आम्ही राज्याच्या कारभार करत आहोत. त्यामुळे मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी विरोधकांना सुबुद्धी द्यावी. त्यांनी या विषयात राजकारण आणू नये,” असे एकनाथ शिंदे संवाद साधताना म्हटले आहे.

हे ही वाचा..

पुण्यात २२ वर्षी नौशाद चालवत होता बनावट टेलिफोन एक्स्चेंज

गजा मारणेच्या हातून सत्कार स्वीकारताच चंद्रकांत पाटील बनले टीकेचे धनी

हिंदू धार्मिक चिन्हे असलेले विजेचे खांब हटवण्याचे आदेश

बांगलादेशात जमात-ए-इस्लामी, इस्लामी छात्र शिबीरवरील बंदी उठवली

एकनाथ शिंदे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर कसा उभा राहील, यासाठी विरोधकांनी पाठपुरावा करावा. बुधावारी आम्ही बैठक घेऊन त्यासाठी दोन समित्या नियुक्ता केल्या आहेत. त्यात आयआयटीचे इंजिनिअर, नौदलाचे अधिकारी आणि इतर लोक असणार आहे. त्या ठिकाणी लवकरच लवकर भव्य पुतळा उभारण्याचे काम केले जाईल.

Exit mobile version